For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महाराष्टात पहिले ए.आय. धोरण जाहीर होणार

01:37 PM Jan 02, 2025 IST | Pooja Marathe
महाराष्टात पहिले ए आय  धोरण जाहीर होणार
Maharashtra's first AI policy to be announced
Advertisement

बैठकीत आशिष शेलार यांनी घेतला आढावा
मुंबई

Advertisement

सध्या आ. ची. क्षेत्रासह इतर अनेक क्षेत्रात ए. आय (आर्टीफिशल इंटॅलिजन्स) या टेक्नॉलॉजीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. आ. टी. क्षेत्रात तर एआय चा वापर झपाट्याने वाढला आहे. डिजीटलायझेशनंतर आता आर्टीफिशल इंटॅलिजन्स या टेक्नॉलॉजीच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे, यासाठी राज्याचे पहिले एआय धोरण तयार करा, असे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी विभागाला दिले.

या बैठकीला आय टी विभागाचे सचिव पराग जैन नैनुटिया, महाआटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बैठकीत मंत्री आशिष शेलार यांनी विभागाच्या कार्याचा आढावा घेतला.
या बैठकीत मंत्री आशिष शेलार म्हणाले, एआय टेक्नॉलॉजीचे युग सुरू झाले आहे. महाराष्ट्राने या क्षेत्रात आघाडी घेतली पाहिजे. एआयचा प्रभावी उपयोग करून आपण अधिक उद्योग, व्यवसाय यातून तरुणांना रोजगाराच्यासंधी उपलब्ध करून देऊ शकतो. जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची हीच संधी आहे. मार्च २०२४ मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'इंडिया एआय मिशन' अंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढविण्यासाठी १०,३७२ कोटींचा निधीन मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये इंडिया एआय डेटासेट्स प्लॅटफॉर्म, एॅप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रकल्प, ग्राफीक प्रोसेसिंग युनिटस्, इंडिया एआय इनोव्हेशन सेंटर, फ्युचर स्किल्स प्रोग्रॅम आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअपस्साठी वित्तपुरवठा याचा समावेश करण्यात आला आहे. आपला देश तंत्रज्ञानात प्रगतीपथावर असताना महाराष्ट्रही यामध्ये अग्रेसर राहिला पाहिजे असेही मंत्री शेलार म्हणाले.

Advertisement

दरम्यान, केंद्र सरकार तर्फे जानेवारी २०२५ पासून वैयक्तीक नसलेल्या डेटासेट्सचे संकलन सुरू करणार आहे. त्यामुळे स्टार्टअप्स, कंपनीज, शैक्षणिक संस्था आणि संशोधका अॅप्स विकसित करण्यासाठी, विविध भाषांची सेवा देण्यासाठी उपयोग होणार आहे.
महाराष्टातील बारामतीमध्ये एआयवर विकसित शेतीचा प्रयोग करण्यात आला आहे. त्यामुळे, एआय हे तंत्रज्ञान वापरुन विविध क्षेत्रात बदल व क्रांती घडविली जाऊ शकते.

Advertisement
Tags :

.