महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पशुबळी-पक्षी उडविण्याच्या प्रथेवर नियंत्रण

11:44 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वडगाव मंगाई देवी यात्रेत पशुबळीला दयानंद स्वामींचा तीव्र विरोध, पोलीस प्रशासनाकडूनही गंभीर दखल

Advertisement

बेळगाव : वडगाव श्री मंगाई देवी यात्रेमध्ये मंदिराच्या आवारात पशुबळी देण्यात येऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचे प्राणी, पक्षी मंदिरावर उडविण्यात येऊ नयेत, असा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी काढला होता. असा आदेश काढण्यासाठी प्राणी कल्याण मंडळाचे अध्यक्ष दयानंद स्वामी यांनी गेल्या महिनाभरापासून जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या प्रयत्नांना बऱ्यापैकी यश येऊन यात्रा परिसरात पक्षी उडविण्याच्या प्रथेवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात पोलीस आणि जिल्हा प्रशासनाला यश मिळाले. कोणत्याही धार्मिकस्थळी देवदेवतांच्या नावाने पशुबळी देण्यास कर्नाटक पशुबळी कायदा 1959 व दुरुस्ती कायदा 1975 अंतर्गत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार स्वामी दयानंद यांनी एक महिन्यापूर्वी बेळगावला येऊन पत्रकार परिषद घेऊन पशुबळी देण्यास निर्बंध घालावेत, यासाठी पत्रकार परिषद घेतली होती. त्याचप्रमाणे उचगाव येथे मळेकरणी देवी परिसरात पशुबळी देण्याची प्रथा स्थगित केल्यानंतर त्यांनी त्याठिकाणी भेट देऊन ग्रामस्थांचे अभिनंदन केले होते.

Advertisement

त्याचवेळी त्यांना मंगाई यात्रेबद्दलही माहिती मिळाली. त्यांनी या यात्रेवेळीसुद्धा पशुबळी देऊ नयेत, अथवा उडवू नयेत, अशी मागणी केली होती. तत्कालिन जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी त्याबाबतचा आदेश बजावला होता. मात्र त्यांची अलीकडेच बदली होऊन नूतन जिल्हाधिकारी म्हणून मोहम्मद रोशन हे रुजू झाले. दयानंद स्वामी यांनी पोलीस आयुक्त यडा मार्टीन मार्बन्यांग व जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची भेट घेऊन निवेदन दिले. पशुबळी देण्यास प्राणी कल्याण मंडळाचा विरोध असल्याचे स्पष्ट केले.

निवेदनाची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी 29 रोजी पशुबळी निषेध कायदा 1959 व दुरुस्ती कायदा 1975 अन्वये श्री मंगाईदेवी यात्रेच्या परिसरात या कायद्याचे उल्लंघन करू नये, असा आदेश बजावला होता. तथापि, याबाबत नागरिकांना फारशी माहिती नव्हती. तसेच एक दिवस आधी आदेश बजावल्याने त्याबाबत जागरुकताही करण्यास वेळ मिळाला नाही. त्यामुळे यात्रा परिसरामध्ये अनेकांनी कोंबडीची पिल्ले उडविली. मात्र याठिकाणी उपस्थित राहून स्वामींनी त्याला तीव्र विरोध केला. पोलीस प्रशासनानेही त्याची गंभीर दखल घेऊन पिल्ले उडविणाऱ्यांना हटकले व त्यांना पिल्ले उडविण्यापासून रोखले. याशिवाय पिल्ले विक्री करणाऱ्यांना परिसरातून हाकलून दिले. ज्या भाविकांच्या हातात अशी पिल्ले दिसून आली, त्यांच्याशी संवाद साधून कोणत्याही देवदेवतेला असा बळी अपेक्षित नसतो. कोणत्याही प्रकारची हिंसा करण्याचा आपल्याला अधिकार नाही. देवालये ही वधालये नव्हेत तर ज्ञानालये व ध्यानालये व्हावीत, असे समुपदेशन करून पिल्ले उडविणाऱ्यांना रोखले.

यात्रा परिसरात चोख पोलीस बंदोबस्त

प्रशासनाने यात्रा परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. स्वामींच्या संरक्षणार्थही पोलीस हजर होते. मार्केट पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सोमेगौडा जी. यू., माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची यांच्यासह कर्नाटक राज्य राखीव दलाचे पोलीस व शहर पोलीस असा 150 हून अधिक जणांचा ताफा यात्रा परिसरात बंदोबस्त ठेवून होता. जरी पिल्ले उडविण्याची प्रथा पूर्णत: बंद झाली नाही तरी स्वामी दयानंद यांच्या प्रयत्नाने जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने त्यावर नियंत्रण आणण्यात यश मिळाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article