बांदा शहरात माकडे, वानरांचा बंदोबस्त करा
शिवसेना ठाकरे पक्ष शहर प्रमुख:
साईप्रसाद काणेकर यांची मागणी
प्रतिनिधी
बांदा
बांदा शहरात माकड व वानरांचा धुडगूस सुरू आहे. माकडांपासून शेती बागायतीचे भरपूर नुकसान करण्यात येते. नागरिक व शेतकरी यांना माकडांच्या उपद्रवा पासून रोखण्यासाठी जलद कृती दलामार्फत त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गट बांदा शहरप्रमुख तथा ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर यांनी लेखी निवेदनाद्वारे जिल्हा उपवनसंरक्षक नंदकुमार रेड्डी यांच्याकडे केली आहे.ते निवेदनात म्हणतात की, बांदा शहरात भरवस्तीत माकड, वानरांचा धुडगूस सुरू आहे. तसेच परिसरात शेती, बागायतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान करण्यात येते. वनविभागाच्या जलद कृती दलामार्फत माकड, वानरे यांना पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येते. तशीच कार्यवाही बांदा शहरात करून माकडांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी साईप्रसाद काणेकर यांनी केली आहे.