For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गयाळवाडी मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल ! भाड्याचे पैसे थकविल्याच्या वादातून मारहाण

12:53 PM Oct 03, 2024 IST | Abhijeet Khandekar
गयाळवाडी मारहाण प्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल   भाड्याचे पैसे थकविल्याच्या वादातून मारहाण
Crime
Advertisement

रत्नागिरी प्रतिनिधी

शहरानजीकच्या गयाळवाडी येथे भाड्याचे पैसे थकविल्याच्या वादातून झालेल्या मारहाण प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत परस्पर विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े सोमवारी सुशांत रविंद्र हिरे (36, ऱा गयाळवाडी रत्नागिरी) यांनी मारहाणीची तक्रार दाखल केली होत़ी तर आता अतुल हनुमंत लाड (ऱा कुवारबाव रत्नागिरी ) यांनी सुशांत हिरे यांच्याविऊद्ध मारहाण केल्याची तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केल़ी.

Advertisement

अतुल लाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सुशांत हिरे यांनी मे 2023 मध्ये त्यांची टेम्पो ट्रव्हलर गाडी भाड्याने घेतली होत़ी या गाडीचे 5 हजार ऊपये भाडे सुशांत यांच्याकडून येणे होत़े हे भाडे मागितल्याच्या रागातून 29 सप्टेंबर 2024 रोजी हातखंबा पेट्रोलपंप येथे सुशांत व अमित उर्फ भाऊ देसाई यांनी अतुल लाड व त्यांचा मित्र सागर पालकर यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल़ी अशी तक्रार अतुल यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केल़ी त्यानुसार पोलिसांनी सुशांत हिरे व अमित देसाई यांच्याविऊद्ध गुन्हा दाखल केल़ा.

तर सुशांत यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी अतुल हनुमंत लाड (ऱा कुवारबाव रत्नागिरी) व सागर किशोर पालकर (ऱा पांडवनगर नाचणे रत्नागिरी) यांच्याविऊद्ध गुन्हा दाखल केला होत़ा त्यानुसार सुशांत हिरे यांनी भाड्याचे पैसे न दिल्याने त्यांचा संशयित आरोपी यांच्याशी वाद झाला होत़ा 29 सप्टेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास सुशांत हा रिक्षाने गयाळवाडी येथून जात असताना संशयित आरोपी यांनी मोटारसायकलवर येवून त्यांची रिक्षा अडविल़ी तसेच संशयितांनी सुशांत यांना दगडाने मारहाण केल़ी अशी तक्रार रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत दाखल करण्यात आल़ी

Advertisement

Advertisement
Tags :

.