कल्पतरू प्रोजेक्टस् इंटरनॅशनलला कंत्राट
07:00 AM Jun 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेंगळूर : बांधकाम क्षेत्रातील कंपनी कल्पतरू प्रोजेक्टस् इंटरनॅशनल यांना 3789 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे कंत्राट प्राप्त झाले आहे. यामध्ये उद्योगांच्या इमारती बांधण्यासंबंधीचा प्रकल्प कंपनीला मिळाला आहे आणि 12 दशलक्ष चौरस फूट क्षेत्रफळावर रहिवासी बांधकाम प्रकल्पाचे कंत्राट कंपनीला प्राप्त झाले आहे. त्यासोबतच ऊर्जा वितरणाचेही कंत्राट कंपनीने मिळवले आहे. पुरवठा, ऊर्जा पुरवठा पाणीपुरवठा व पाटबंधारे प्रकल्प, रेल्वे प्रकल्प, तेल आणि वायू पाईपलाईनचे प्रकल्प, महामार्ग आणि विमानतळ या सर्वच क्षेत्रामध्ये कंपनी कार्यरत आहे. कंपनीचे जवळपास 30 देशांमध्ये सध्याला प्रकल्प सुरू आहेत. एकंदर पाहता 75 देशांमध्ये कंपनीची उपस्थिती दिसून येते.
Advertisement
Advertisement