For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चिवला बीचवरील जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गातील स्पर्धकांना प्रवेश फीमध्ये सवलत मिळावी

04:39 PM Dec 10, 2024 IST | अनुजा कुडतरकर
चिवला बीचवरील जलतरण स्पर्धेत सिंधुदुर्गातील स्पर्धकांना प्रवेश फीमध्ये सवलत मिळावी
Advertisement

मालवण भाजप शहर मंडळ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांचे निवेदन

Advertisement

मालवण । प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य जलतरण संघटना यांच्या मान्यतेने सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने चिवला बीच मालवण येथे २१, २२ डिसेंबर रोजी आयोजित राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पर्धकांना प्रवेश फी मध्ये सवलत मिळावी यासाठी मालवण भाजपच्या शहर मंडळ अध्यक्ष विष्णू मोंडकर यांच्या वतीने बाबा परब, उपाध्यक्ष जलतरण संस्था सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले.

Advertisement

मालवण चिवला बीच येथे संपन्न होणाऱ्या या जलतरण स्पर्धेत राज्यासह राष्ट्रीय, अंतराराष्ट्रीय स्पर्धक सहभागी होत असतात. मात्र आर्थिक परिस्थितीमुळे जिल्ह्यातील स्पर्धकांना स्पर्धेत सहभागी होणे शक्य होत नसल्याने मालवण भाजपच्या वतीने बाबा परब, उपाध्यक्ष जलतरण संस्था सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भाजप शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, पंकज सादये, ललित चव्हाण, कॅलिस फर्नांडिस उपस्थित होते.

यावेळी बाबा परब यांनी मालवण भाजपच्या विनंतीनुसार मालवण तालुक्यातील स्पर्धकांना प्रवेश फी मध्ये सवलत देण्यात येत असल्याचे सांगितले. या स्पर्धेसाठी यापूर्वी दोन हजार रुपये प्रवेश फी होती. यावर्षी प्रवेश फी अडीज हजार रुपये आहे. मात्र मालवण तालुक्यातील स्पर्धकांना या प्रवेश फी मध्ये सवलत देण्यात येत असून या स्पर्धकांकडून स्पर्धेसाठी १ हजार प्रवेश फी आकारण्यात येत असल्याचे स्पष्ट केले. तरी स्पर्धकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी अर्ज भरावा असे आवाहन भाजपा शहर मंडळ अध्यक्ष बाबा मोंडकर बाबा परब, उपाध्यक्ष जलतरण संस्था सिंधुदुर्ग यांनी केले आहे. स्पर्धेत आतापर्यंत ८ राज्य, २७ जिल्ह्यातील १,२०० स्पर्धक तर १ आंतरराष्ट्रीय स्पर्धकाने सहभाग नोंदवला आहे अशी माहिती बाबा परब यांनी दिली.

Advertisement
Tags :

.