For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खमकारहट्टीजवळ कंटेनर कलंडला

06:45 AM Sep 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
खमकारहट्टीजवळ कंटेनर कलंडला
Advertisement

चालक-वाहकाने गांजा सेवन केल्याचे स्पष्ट

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

गांजा सेवन करून कंटेनर चालवताना खमकारहट्टी ब्रिजजवळ कंटेनरला अपघात झाला. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली असून, या अपघातात चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले आहेत. या दोघा जणांवर गांजा सेवन केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

दिलीपकुमार रामतीर्थ निशाद (वय 25) राहणार बाबुकपुरा, जि. आंबेडकरनगर, उत्तरप्रदेश, हिमांशू टिलटू निशाद (वय 25) राहणार हुसेनपूर सकरवारी, जि. आंबेडकरनगर, उत्तरप्रदेश अशी त्यांची नावे आहेत. या दोघा जणांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाले आहे.

धारवाडहून बेळगावकडे येणाऱ्या कंटेनरची दुभाजकाला धडक बसून ती महामार्गावर उलटली. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक सुंदरेश होळेन्नावर, उपनिरीक्षक अविनाश ए. वाय., उपनिरीक्षक बी. के. मिटगार, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वाय. एस. लक्कर आदी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. कंटेनरमधील चालक व क्लिनरने गांजा सेवन केल्याचे लक्षात आले.

पोलिसांनी दिलीपकुमार व हिमांशू यांची वैद्यकीय तपासणी केली असता गांजा सेवन करून कंटेनर चालवल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या दोघा जणांवर हिरेबागेवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :

.