For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रमुख प्रशिक्षक पदासाठी पीसीबी लँगर, कर्स्टन यांच्या संपर्कात

06:00 AM Mar 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
प्रमुख प्रशिक्षक पदासाठी पीसीबी लँगर  कर्स्टन यांच्या संपर्कात
Advertisement

वृत्तसंस्था /कराची

Advertisement

पाक क्रिकेट मंडळाने (पीसीबी) राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. पीसीबीकडून विदेशातील अनेक आघाडीच्या प्रशिक्षकांसाठी संपर्क चालू ठेवला आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या शेन वॅटसनने या पदासाठी पीसीबीची ऑफर साफपणे नाकारली आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या जस्टीन लँगर आणि द. आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन यांच्याशी पीसीबी संपर्कात असल्याचे वृत्त येथील एका वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे. ऑस्ट्रेलियाचे जस्टीन लँगर, मॅथ्यू हेडन, द. आफ्रिकेचे गॅरी कर्स्टन, माईक हेसन, इयॉन मार्गन आणि फिल सिमन्स यांच्याशी पीसीबीने संपर्क साधला आहे.  आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आणि चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दृष्टीकोनातून पीसीबीने आपल्या संघासाठी विदेशी प्रशिक्षकाची नियुक्ती करण्याचे ठरविले आहे. दरम्यान मिकी आर्थर, ग्रँट ब्रॅडबर्न आणि अँड्य्रु पुटीक या विदेशी प्रशिक्षकांना मात्र पीसीबीने डावलले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.