For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ग्राहकांनी सजग राहणे आवश्यक- ॲड.नकुल पार्सेकर

03:44 PM Dec 26, 2023 IST | अनुजा कुडतरकर
ग्राहकांनी सजग राहणे आवश्यक  ॲड नकुल पार्सेकर
Advertisement

सावंतवाडीत राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम संपन्न

Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

१९८६ साली भारताचे तत्कालीन पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांनी ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा संमत केला. त्यावेळी संसदेमध्ये हा कायदा मंजूर करताना स्व. राजीव गांधी आपल्या संबोधनात म्हणाले होते की, " या नवीन कायद्यामुळे ग्राहकांच्या हिताचे निश्चितपणे रक्षण होईल. मात्र ग्राहक हा राजा असून त्याने आपले अधिकार तपासून खरेदी करताना सजग राहीले पाहिजे ".. मात्र हा कायदा होवून तब्बल ३७ वर्षे लोटली तरी आजही मोठ्या प्रमाणात ग्राहकांची फसवणूक होते. विशेषतः ऑनलाईन खरेदीमध्ये ग्राहकांची लुबाडणूक होत असून त्यासाठी शासन आणि या चळवळीत काम करणाऱ्या सामाजिक संस्थाकडून जनजागृतीचा व्यापक कार्यक्रम हाती घेतला पाहिजे असे प्रतिपादन ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य ॲड नकुल पार्सेकर यांनी केले. सावंतवाडी तहसीलदार कार्यालयाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Advertisement

यावेळी उपस्थित अशासकीय सदस्य व जिल्ह्यातील प्रसिद्ध स्ञीरोगतज्ञ डॉ. राजेश नवांगुळ यांनी वैद्यकीय सेवेतील अनेक ञुटी व त्यामुळे रुग्णांना होणारा ञास याबाबत माहिती दिली. ग्राहकांने त्यांनी दिलेल्या मोबदल्यात त्यांना योग्य सेवा देण्याचा संबधित आस्थापनेने प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. अशासकीय सदस्य प्रा. सुभाष गोवेकर यांनी स्व. बिंदू माधव जोशी यांनी या देशात ग्राहकांच्या हितासाठी सुरू केलेल्या ग्राहक चळवळीची सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमाला नायब तहसीलदार श्री मनोज मुसळे, पुरवठा विभागाच्या सौ. पुजा सावंत, श्री पंकज किनळेकर, सार्वजनिक सेवेचे प्रतिनिधी व ग्राहक उपस्थित होते. अप्पर तहसीलदार श्रीमती मोनिका कांबळे यांनी आभार मानले.

Advertisement
Tags :

.