महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

न्यूझीलंडच्या ऑकलंडमध्ये लवकरच महावाणिज्य दूतावास

06:37 AM Aug 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची घोषणा  : भारतीय समुदायाला केले संबोधित

Advertisement

वृत्तसंस्था/  ऑकलंड

Advertisement

न्यूझीलंडच्या ऑकलंड शहरात लवकरच भारताचा महावाणिज्य दूतावास सुरू होणार आहे. महावाणिज्य दूतावास कार्यरत झाल्याने भारत आणि न्यूझीलंडचे संबंध मजबूत होतील आणि यामुळे न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाला लाभ होणार असल्याचे उद्गार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काढले आहेत. राष्ट्रपती मुर्मू सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून त्यांनी ऑकलंड येथे भारतीय समुदायाला संबोधित केले आहे. तसेच भारतीय वंशाच्या लोकांच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले आहे.

भारत आणि न्यूझीलंडचे संबंध अत्यंत दृढ आणि बहुआयामी आहेत. भारतीय समुदाय या संबंधांच्या विकासात महत्त्वाचे योगदान देतो. भारत लवकरच ऑकलंडमध्ये महावाणिज्य दूतावास सुरू करणार आहे. ऑकलंडमध्ये राहत असलेल्या भारतीयांची याकरता दीर्घकाळापासून मागणी होती असे मुर्मू यांनी म्हटले आहे. ऑकलंडमध्ये सध्या भारताचा ऑनरेली महावाणिज्य दूतावास आहे. तर वेलिंग्टनमध्ये भारतीय दूतावास आहे.

न्यूझीलंडच्या एकूण लोकसंख्येत 6 टक्के भारतीय वंशाचे लोक आहेत. न्युझीलंडच्या प्रत्येक क्षेत्रात भारतीयांनी स्वत:चा ठसा उमटविला आहे. कठोर मेहनत आणि समर्पणाद्वारे भारतीय समुदायाने देशाचा विकास आणि अर्थव्यवस्थेत योगदान दिल्याचे म्हणत राष्ट्रपतींनी आनंद सत्यानंद यांचे उदारहण दिले. आनंद सत्यानंद हे न्यूझीलंडमधील माजी न्यायाधीश आहेत. आनंद हे 2006-11 या कालावधीत न्यूझीलंडचे 19 वे गव्हर्नर जनरल राहिले आहेत.

भारत जगात लोकशाहीचे प्रतीक

राष्ट्रपती मुर्मू यांनी न्यूझीलंडचे गव्हर्नर जनरल डेम सिंडी कीरो, पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन आणि उपपंतप्रधान विंस्टन पीटर्स यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली आहे. भारत सध्या जगात लोकशाहीचे प्रतीक आहे. लवकरच आम्ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरणार आहोत. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्किल इंडिया यासारखे पुढाकार आमच्या नागरिकांना सशक्त करत आहेत. 2047 पर्यंत विकसित राष्ट्र होण्याचे लक्ष्य प्राप्त करण्याच्या दिशेने आम्ही वाटचाल करत असताना आम्ही आमच्या अनिवासी भारतीयांसोबतचे संबंध आणखी मजबूत करू इच्छितो असे उद्गार राष्ट्रपतींनी काढले आहेत. न्यूझीलंडच्या 2018 च्या जनगणनेनुसार तेथे भारतीय वंशाच्या लोकांची संख्या सुमारे अडीच लाख इतकी आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article