वडगाव पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात जलकुंभाची उभारणी
10:37 AM Jun 07, 2024 IST
|
Tarun Bharat Portal
बेळगाव : वडगाव येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या शेजारी स्मार्ट सिटीअंतर्गत जलकुंभ उभारला जात आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय दवाखान्यात ये-जा करणे अडचणीचे ठरू लागले आहे. दवाखान्याच्या भिंतीला लागूनच जलकुंभ उभारला जात आहे. त्यामुळे पशुपालकांना जनावरे घेऊन येणे अडचणीचे ठरत आहे. प्रवेशद्वारावरच हे विकासकाम सुरू असताना दवाखान्यात कसे जायचे, असा प्रŽही पशुपालकांना पडला आहे. आधीच श्वानसोबत जनावरांनाही विविध रोगांची लागण होत आहे. त्यामुळे येथे येण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर हा संपूर्ण परिसर मद्यपींचा अड्डा बनत चालला आहे. पशुवैद्यकीय दवाखान्याच्या बाजूस प्रत्येक ठिकाणी दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. रात्री या परिसरात अवैध प्रकाराला ऊत येत आहे. पशुवैद्यकीय दवाखाना व वडगावची चावडी अडचणीत सापडली आहे. याकडे कोणी लक्ष देणार का? असा सवाल येथील नागरिक करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने गांभीर्याने याकडे लक्ष देऊन इथल्या समस्या दूर कराव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे.
Advertisement
मात्र पशुपालकांची गैरसोय : परिसराची दुर्दशा
Advertisement
Advertisement
Advertisement
Next Article