जर्मनीत विशाल आकाराच्या विहिरींची निर्मिती
कारण जाणून घेतले तर व्हाल थक्क
हवामान बदलामुळे जगातील भूमिगत पाणी वेगाने कमी होत आहे. विशेषकरून गोडे पाणी मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे. पृथ्वीवरील पिण्यायोग्य पाणी संपले तर माणूस आणि प्राण्यांचे अस्तित्व संपण्यास फार वेळ लागणार नाही. अशास्थितीत जर्मनी आता एका अशा पर्यायावर काम करत आहे, जो भारतात शतकांपासून अस्तित्वात आहे.
जर्मनीची राजधानी बर्लिन एका अशा ठिकाणी जेथे दुष्काळाची स्थिती नेहमीच निर्माण होते. दरवर्षी उन्हाळ्यात तेथील लोकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. अशास्थितीत बर्लिन प्रशासनाने शहरात मोठमोठ्या विहिरींची निर्मिती करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे बर्लिन शहराला भूमिगत जल पातळी वाढविण्यास मदत होईल तसेच पावसाचे पाणी आणि नाल्यात वाहणाऱ्या सांडपाण्यापासून नदीला सुरक्षित ठेवता येणार असल्याचे तज्ञांचे मानणे आहे.
वेगळ्या प्रकारच्या विहिरी
या विहिरी सर्वसाधारण भारतीय विहिरींप्रमाणे नाहीत. तर या एखाद्या टँकप्रमाणे आहेत. यात पाण्याचा साठा होण्यासोबत त्यावर प्रक्रिया करुन ते पिण्यायोग्य केले जाते. जर्मनीतील सर्वात मोठे बेसिन या शहरात 2026 मध्ये तयार होणार आहे. या बेसिनमध्ये 17 हजार क्यूबिक मीटर पाणी एकत्र केले जाऊ शकणार आहे.
भारतासाठी किती उपयुक्त
दरवर्षी जेव्हा अतिवृष्टी होते, तेव्हा अनेक शहरांमध्ये पूरसदृश स्थिती निर्माण होते. तर हीच शहरे उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरी जातात. अशास्थितीत या मोठ्या शहरांमध्ये अशाप्रकारच्या विहिरी निर्माण केल्या तर पावसाचे पाणी साठवता येईल आणि भूजल पातळीही वाढविण्यास मदत होणार आहे. याचबरोबर शहरातील सांडपाणी देखील याच बेसिनमध्ये एकत्र झाल्यास नद्या प्रदूषित होणार नाहीत. भारतात अशाप्रकारचे पाऊल उचलले गेले तर आगामी पिढ्यांना शतकांपर्यंत लाभ मिळू शकतो.