For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओबीसीसाठी उपसमिती स्थापन करणार

06:32 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
ओबीसीसाठी उपसमिती स्थापन करणार
Advertisement

ओबीसींसाठी न्यायाचा मार्ग मोकळा, मराठ्यांइतका निधीही मिळणार

Advertisement

मुंबई : ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून लक्ष्मण हाकेनी जालन्यामध्येच उपोषण सुरू केले. त्यांच्या आंदोलनाची सरकारला दखल घ्यावी लागली आहे. लक्ष्मण हाके यांच्या उपोषणावर मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने शुक्रवारी राज्यातील सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांसोबत बैठक घेतली. यात मराठा आरक्षणप्रश्नी नेमलेल्या उपसिमितीप्रमाणे ओबीसींसाठीही मंत्रिमंडळाची उपसमिती नेमण्यात येणार असल्याची चर्चा या बैठकीत झाली. या निर्णयामुळे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हापेंच्या नऊ दिवसांच्या उपोषणाला व ओबीसींच्या आंदोलनाला काही प्रमाणात यश मिळाले आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, गिरीष महाजन, अतुल सावे, छगन भुजबळ यांच्यासह ओबीसींचे नेते प्रकाश शेंडगे आणि इतर ओबीसी नेते उपस्थित होते.

मराठ्यांना जेवढा निधी दिला जातो. त्या प्रमाणात ओबीसींनाही निधी देण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे. ओबीसी आणि मराठा नेत्यांना एकत्र बसविण्यात येणार असून त्यातून मार्ग काढण्यात येणार असून आता पुन्हा बैठक 29 जून रोजी घेण्यात येणार  असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणापुढे दुर्लक्षित करण्यात आलेल्या ओबीसीनाही आता लक्ष्मण हाकेच्या आंदोलनामुळे बळ मिळाले आहे. त्यांच्या मागण्या विचारार्थ स्वीकारण्याची सरकारने तयारी दाखवली आहे.

Advertisement

दुसऱ्यांवर अन्याय नको :  भुजबळ

मराठ्यांना आरक्षण देण्यास विरोध नाही, मात्र दुस़ऱ्यांवर अन्याय नको. सरसकट दाखले दिले तर सगळे मराठा कुणबी होतील. त्यामुळे ओबीसींवर अन्याय होईल. खोटी वंशावळ दाखवून कुणबी दाखले दिले जात आहेत, असा आरोप छगन भुजबळ यांनी केला. लक्ष्मण हाके यांचे प्रतिनिधी मफणाल ढोले पाटील यांनी सगेसोयरे अध्यादेश रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच दिलेल्या कुणबी नोंदींवर श्वेतपत्रिका काढा, अशी मागणी केली. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये. त्याची स्पष्टता सरकारने करावी. दबावाखाली दाखले दिले असल्यास त्याची चौकशी करा, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली. सरसकट कुणबी म्हणून मराठ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार नाही. सगेसोयरेंचा अध्यादेश रद्द करा, ओबीसीतून आरक्षण देऊ नका. मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदी बोगस आणि खोट्या आहेत. प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने तात्काळ नोंदी थांबवा. सगेसोय़र्यांवर 27 तारखेला सुनावणी आहे. तोपर्यंत नोंदी थांबवा, अशी भूमिका प्रकाश शेंडगे यांनी मांडली.

सत्तेच्या दबावाखाली चुकीचे दाखले दिले आहेत का? : पंकजा मुंडे

सत्तेचा गैरवापर करुन किंवा दबावाखाली चुकीचे सर्टिफिकेट दिले गेले आहेत का? असल्यास त्याची चौकशी करावी, तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का कसा लागत नाही याबद्दलची स्पष्टता करावी अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आज ट्विटद्वारे सरकारकडे केली.

मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात मंत्र्यांचे शिष्टमंडळ पुणे व वडीगोद्रीला जाणार

मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मंत्र्यांचे शिष्टमंडळ आज पुणे आणि वडीगोद्री येथे जाणार आहे.  सकाळी 11 वाजता पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील येथे ओबीसी आंदोलक अॅड. मंगेश ससाणे यांची भेट घेणार आहे. तसेच दुपारी 2 वाजता वडीगोद्री जालना येथे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची भेट घेणार आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार

मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या संदर्भात बॅकफूटवर राहिलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता लोकसभा निवडणुकीनंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मात्र फ्रंटफूटवर आले आहेत.  आता ओबीसी आरक्षणप्रश्नी उपोषण करणारे लक्ष्मण हाके यांनी आपण सरकारकडे शिष्टमंडळ पाठवणार नाही, तर सरकारने आपल्याकडे यावे अशी भूमिका घेतली होती. मात्र आज लक्ष्मण होके यांचे शिष्टमंडळ सरकारबरोबर चर्चा करण्यासाठी आले असून सह्याद्री अतिथीगफहात प्राथमिक चर्चाही झाली. या प्रश्नी गिरीश महाजन यांनी लक्ष्मण हाके यांची देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे कऊन दिले. त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी सरकारशी चर्चेसाठी शिष्टमंडळ पाठवण्याचा निर्णय घेतला.

आंदोलन कसे करावे हे लक्ष्मण हाकेंकडून शिका : पंकजा मुंडे

राज्यातील आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असून मराठा आरक्षणासाठी  लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 1 महिन्याचा अवधी देत आपले उपोषण नुकतेच मागे घेतले आहे. मात्र, दुसरीकडे जालना जिह्यातील वडीगोद्री येथे जाऊन लक्ष्मण हाके यांनी ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे. त्यामध्ये, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे. यावेळी सरकारच्या धोरणावर आपण नाराज असल्याचे पंकजा मुंडेंनी कबुली दिली आहे. आता पुन्हा एकदा पंकजा मुंडेंनी ट्वीट करत निशाणा साधला आहे. आंदोलन कसे करावे हे लक्ष्मण हाकेंकडून शिका, असा टोला पंकजा मुंडेंनी लगावला आहे. पंकजा मुंडेंनी ट्वीट करताना कोणाचेही नाव न घेतल्याने पंकजा मुंडेंचा रोख नेमका कोणाकडे आहे? या चर्चांना उधाण आले आहे.

जरांगे तुम्हाला आरक्षणातले शून्यसुद्धा ज्ञान नाही :  लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

लक्ष्मण हाके यांच्या उपोषणाचा आज नऊवा दिवस आहे. अश्यातच, राज्य सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली असून राज्यसरकारच्या शिष्टमंडळाने लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणस्थळी भेट घेतली. या भेटीवेळी शिष्टमंडळाने त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.मात्र हाके आणि वाघमारे आंदोलनावर ठाम आहेत.  यावेळी बोलताना ओबीसी नेते लक्ष्मण हाके म्हणाले की, ‘मिस्टर जरांगे तुम्हाला आरक्षणातलं पॉईंट शुन्यस्द्धा ज्ञान नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली. मंडल आयोग लागू होऊन 27 ते 28 वर्षे झाली आहेत आणि 70 वर्षांचा जावयी शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतो, जरांगे तुमची माझ्यासमोर बोलायची लायकी नाही. तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोलायला सांगा. असा सवालही हाके यांनी यावेळी केला आहे.

राज्य सरकारच्या 9 मंत्र्यांना पाडणार  :जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मनोज जरांगे यांनी या पत्रकार परिषदेत राज्य सरकारला मोठा इशारा दिला. जालन्यात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं देखील उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी नेत्यांची आज सरकारसोबत बैठक पार पडत आहे. असं असताना मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला मोठा इशारा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारच्या 9 मंत्र्यांना पाडणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.