महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पाच टप्प्यातील मतदारसंघनिहाय आकडेवारी जाहीर

06:09 AM May 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अपप्रचार करणाऱ्यांना निवडणूक आयोगाची फटकार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

निवडणूक आयोगाने शनिवारी गेल्या पाच टप्प्यात झालेल्या निवडणुकांबाबत अंतिम आकडेवारी सादर केली. लोकसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या पाच टप्प्यात कोणत्या मतदारसंघात किती टक्के लोकांनी मतदान केले याची मतदारसंघनिहाय इत्यंभूत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. मतांच्या टक्केवारीबाबत काही दिशाभूल करणारे संदेश पसरवले जात असतानाच मतदान संख्येत कोणताही फेरफार होणे शक्य नसल्याचे निवडणूक आयोगाने या आकडेवारीच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ‘एडीआर’च्या याचिकेवर सुनावणी करताना नुकतेच निवडणूक आयोगाला स्पष्ट निर्देश देण्यास नकार दिला होता. केवळ निवडणुकीतील मतदानाचा अंतिम डेटा सार्वजनिक करावा आणि मतदानसंघनिहाय डेटा सार्वजनिक करावा, असे म्हटले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या शुक्रवारच्या या आदेशानंतर एका दिवसातच निवडणूक आयोगाने शनिवारी लोकसभा मतदारसंघनिहाय निवडणुकीच्या शेवटच्या पाच टप्प्यांची आकडेवारी जाहीर केली.

कोणत्याही परिस्थितीत टक्केवारीत बदल अशक्य!

निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी अधिक व्यापकपणे सार्वजनिक करण्याचा निर्णय घेत पाच टप्प्यातील मतदानाची आकडेवारी अधिकृतपणे जाहीर केली आहे. याअंतर्गत पाच टप्प्यात निवडणूक झालेल्या प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदानाची संख्या आणि टक्केवारी सार्वजनिक करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शक असून त्यात कोणतीही अनियमितता नसल्याचे म्हटले आहे. सर्व उमेदवारांच्या अधिकृत प्रतिनिधींना मतदान केंद्रनिहाय 17सी फॉर्म दिले जात आहेत. देशभरात एकूण 10.5 लाख मतदान केंद्रे आहेत. फॉर्म 17सी मधील मतदान क्रमांक कोणत्याही परिस्थितीत बदलला जाऊ शकत नाही. सदर डेटा उमेदवाराकडे राहील. उमेदवार आणि त्याच्या एजंटला हा फॉर्म 17सी मतमोजणी केंद्रात नेण्याची परवानगी आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

दिशाभूल करणे अयोग्य

निवडणूक प्रक्रियेबाबत नेहमीच दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचा पॅटर्न तयार करण्यात आला आहे. प्रत्यक्ष मतदानाअंती पडलेल्या मतांच्या संख्येत कोणताही बदल होण्याची शक्मयता नाही. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आदेश दिल्यानंतर आयोगाला अधिक बळकटी जाणवत असून लोकशाही निवडणूक प्रक्रियेत आयोगाची जबाबदारी आणखीनच वाढते, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पाच टप्प्यातील मतदानाची टक्केवारी

टप्पा 1     : 66.14 टक्के

टप्पा 2    : 66.71 टक्के

टप्पा 3     : 65.68 टक्के

टप्पा 4    : 69.16 टक्के

टप्पा 5     : 62.20 टक्के

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article