For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News: कर्तव्य बजावताना साताऱ्यातील सासुर्वेच्या सुपुत्राला वीरमरण

02:46 PM Aug 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
satara news  कर्तव्य बजावताना साताऱ्यातील सासुर्वेच्या सुपुत्राला वीरमरण
Advertisement

अरुणाचल प्रदेशमध्ये कर्तव्य बजावताना प्रवीण वायदंडे झाला हुतात्मा

Advertisement

एकंबे: कोरेगाव तालुक्यातील सासुर्वे येथील सुपुत्र, हवालदार प्रवीण अंकुश वायदंडे यांना अरुणाचल प्रदेश येथे चीन सीमेवर शनिवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले.

महार रेजिमेंट, 22 इन्फंट्री ब्रिगेडमध्ये कार्यरत असलेले जवान प्रवीण वायदंडे अरुणाचल प्रदेशात तैनात होते. देशसेवेसाठी वीरमरण आलेल्या जवान वायदंडे यांच्या जाण्याने सासुर्वे गावासह संपूर्ण पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

Advertisement

शहीद जवान प्रवीण वायदंडे यांचे पार्थिव रविवारी सकाळपर्यंत सासुर्वे गावात पोहोचणार आहे. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ग्रामस्थ, नातेवाईक, तसेच आजी-माजी सैनिक बांधवांनी तयारी केली आहे. महसूल प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देऊन त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

Advertisement
Tags :

.