For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पणजीवासियांच्या मतांचे मूल्य शून्य करण्याचा कट

12:19 PM May 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
पणजीवासियांच्या मतांचे मूल्य शून्य करण्याचा कट
Advertisement

बीएलओ बदली प्रकरण : महसूलमंत्र्यांवर पर्रीकरांची टीका

Advertisement

तिसवाडी : राज्यातील 40 मतदारसंघांपैकी केवळ पणजी मतदारसंघातील 30 पैकी 28 बूथस्तरीय अधिकाऱ्यांची (बीएलओ) तडकाफडकी बदली स्वत:चा राजकीय डाव साधण्यासाठी केली गेली आहे. नेपाळी आणि इतर परप्रांतीयांना मतदारयादीत टाकून आपली वोट बँक निर्माण करून पणजीवासियांच्या मतांचे मूल्य शून्य करण्याचा कट महसूलमंत्री तथा पणजीच्या आमदाराने रचला आहे, असा आरोप उत्पल पर्रीकर यांनी केला आहे. राज्यातील 40 पैकी फक्त एकाच पणजी मतदारसंघात हा प्रयोग केला गेला असून सरकारला बीएलओंची बदली करायची असेल, तर संपूर्ण राज्यातील मतदारसंघांतील सर्वांची करण्यात यावी.

आपल्या पदाचा गैरवापर करून राजकीय स्वार्थ साधण्याचा हा एकदम खालच्या स्तराचा प्रकार आहे. मतदारयादीत गौडबंगाल करून आपल्या मर्जीतील लोकांना टाकून निवडणुकीत लाभ मिळण्याचा प्रयत्न आहे. लवकरच पणजी मनपा आणि त्यानंतर विधानसभा निवडणूक होणार असल्याने त्यावर डोळा ठेवून ही कृती करण्यात आल्याची दिसते. हा प्रकार गंभीर असून याबद्दल उत्तर गोवा जिल्हाधिकारी आणि तिसवाडी मामलेदारांना पत्र लिहिणार आहे, असे उत्पल यांनी स्पष्ट केले. हा प्रकार पूर्वी देखील काही प्रमाणात घडला असून संशयास्पदरित्या काही घरांमध्ये मतदार वाढले होते. एकाच घरात एवढे मतदार होणे शक्मय नाही. आता बीएलओंची बदली केल्याने कट उघड झाला आहे. आपली यावर नजर असणार आहे, त्याशिवाय यावर कायदा तज्ञांचा सल्ला घेऊन पुढील वाटचाल निश्चित करणार असल्याचे उत्पल पर्रीकर यांनी सांगितले.

Advertisement

Advertisement
Tags :

.