For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गडांचे संवर्धन काळाची गरज

10:40 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
गडांचे संवर्धन काळाची गरज
Advertisement

श्रीमंत रमेशराव रायजादे, शिवाजी ट्रेलतर्फे गडकिल्ल्यांवर पूजा

Advertisement

बेळगाव : सालाबादप्रमाणे पुणे येथे असणाऱ्या शिवाजी ट्रेल या संघटनेतर्फे ज्या ज्या ठिकाणी छ. शिवाजी महाराजांच्या आणि मराठा सैन्यांच्या भारतभर पाऊल खुणा आहेत अशा गडकिल्ल्यांवर स्वराज्यातील सरदार घराण्याच्या वंशजांच्या हस्ते एकाच दिवशी 150 पेक्षा अधिक गडांवर पूजा करण्यात आली. त्यानुसार बेळगाव येथील भुईकोट किल्ला, राजहंसगड, चंदगड तालुक्यातील पारगड येथे पूजन झाले. त्याचाच भाग म्हणून बेळगाव येथील भुईकोट किल्ला व येळ्ळूर जवळील राजहंसगडावर शिवाजी ट्रेलचे संयोजक आणि सद्भावना दूत श्रीमंत रमेशराव केशवराव रायजादे यांनी सहपत्नी याबरोबरच हारोलीकर सरकार आणि दिलीपराव केशवराव रायजादे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. या उपक्रमाच्या माध्यमातून भावी पिढीला गडकिल्ल्यांचे महत्त्व पटवून देणे आणि किल्ल्यांचे संवर्धन व जतन व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविला जात आहे. कर्नाटक सरकार व केंद्र सरकारने किल्ल्यांचे संवर्धन करावे. जेणे करून हे किल्ले भावी पिढीला प्रेरणादीय ठरतील व वारसास्थळ म्हणून जतन करणे गरजेचे असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. शूरविरांनी आपले रक्त सांडून केलेल्या पराक्रमाचे किर्तीस्तंभ आहेत. त्यांचे जतन होणे ही काळाची गरज आहे. यासाठीच अशा प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. किल्ला येथील दुर्गादेवी मंदिरात पूजन करण्यात आले. पौरोहित्य बसवराज मठपती यांनी केले. या कार्यक्रमाला श्रीमंत सुचिता रमेशराव रायजादे, किल्लेदार गडकरी, श्रीमान सतीशराव कृ. चिरमुरे (पारगड), किल्लेदार गडकरी स्मिता सतीशराव चिरमुरे (पारगड), कलमेश्वर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त नारायण खन्नुकर, मनोहर भुईंगडे, आनंद हणमंताचे, राहुल हणमंताचे, नागेश पाटील आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.