For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यास सुरुवात

12:51 PM Oct 28, 2025 IST | Tarun Bharat Portal
वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यास सुरुवात
Advertisement

वेळेत बिल भरण्याची हेस्कॉमकडून सूचना

Advertisement

बेळगाव : विजेचे बिल वेळेवर भरले जात नसल्याने हेस्कॉमकडून वीजकनेक्शन तोडले जात आहे. मागील चार दिवसांत थकबाकीदारांना कळवूनही बिल न भरलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. शहरात अंदाजे 4 कोटीहून अधिक वीजबिल थकीत आहे. त्यामुळे हेस्कॉमकडून बिल जमा करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. गृहज्योती योजनेमध्ये केवळ ठरवून दिलेल्या युनिटपर्यंतच वीज मोफत दिली जात आहे. त्याहून अधिक वापर होत असल्यास ग्राहकांना त्या महिन्याचे वीजबिल दिले जाते. परंतु, अनेक ग्राहकांनी वीजबिल भरलेले नाही. अनेकवेळा सूचना देऊनदेखील वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ग्राहकांचे कनेक्शन तोडण्याची कारवाई सुरू आहे.

नवीन मीटरसाठी कडक नियम

Advertisement

शहरी भागात वीजबिल भरण्यासाठी हेस्कॉमचे काऊंटर, तसेच बेळगाव वन कार्यालय उपलब्ध आहे. ग्रामीण भागात ग्राम पंचायत अथवा सार्वजनिक ठिकाणी विजेचे बिल जमा करून घेतले जाते. त्याचबरोबर ऑनलाईन हेस्कॉमच्या वेबसाईटवर, तसेच गुगल पे, फोन पे यासारख्या प्लॅटफॉर्मवरदेखील बिल भरून घेतले जात आहे. सध्या नवीन मीटर घेणे अनेक नियमांमुळे कठीण झाले आहे. ओसी, सीसी, तसेच इतर कागदपत्रे जमा करावी लागत आहेत. त्यामुळे एखाद्यावेळी वीजकनेक्शन तोडल्यास पुन्हा नवीन मीटर घेण्यासाठी नागरिकांना धावपळ करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

नागरिकांनी थकीत वीजबिल भरणे गरजेचे 

शहरात अनेक ग्राहकांची वीजबिलाची थकबाकी आहे. मागील अनेक महिन्यांची थकबाकी वाढत जात असून नागरिकांनी वेळेत वीजबिल भरणे गरजेचे आहे. दिलेल्या वेळेत वीजबिल न भरल्यास वीज कनेक्शन तोडण्याची कारवाई करावी लागत आहे. त्यापूर्वी नागरिकांनी ऑनलाईन अथवा हेस्कॉमच्या काऊंटरवर वीजबिल भरणे गरजेचे आहे.

- मनोहर सुतार (कार्यकारी अभियंता हेस्कॉम)

Advertisement
Tags :

.