महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

तेलंगणात काँग्रेसचेच राज्य येणार !

05:09 AM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तेलंगणात काँग्रेसचीच पूर्ण बहुमताची सत्ता येणार, असा ठाम विश्वास कर्नाटकाचे मंत्री डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केला आहे. ते एका वृत्तवाहिनीला शनिवारी मुलाखत देत होते. काँग्रेस राज्यात सत्तेवर येणार आणि 9 डिसेंबर या सोनिया गांधींच्या वाढदिवशी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याच्या नेतृत्वात राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक होणार, असे प्रतिपादन त्यांनी या मुलाखतीत केले. या बैठकीत काँग्रेसने राज्यातील जनतेला दिलेल्या सर्व सहा ‘गॅरेंटीं’ लागू करण्यात आल्याची घोषणा होणार, अशीही स्पष्टोक्ती त्यांनी या मुलाखतीत केली. लोकांना राज्यात परिवर्तन हवे आहे. तसेच सध्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या प्रसिद्ध फार्महाऊसमध्येच कायमचे परतावे, अशी राज्यातील जनतेची इच्छा आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समितीच्या सरकारचे दिवस भरत आले असून आता काही कालावधीचाच प्रश्न आहे. 3 डिसेंबरला दुपारी दोन वाजेपर्यंत राज्यात सत्तापरिवर्तनावर जनतेची मुद्रा उमटलेली असेल. रात्रीपर्यंत सत्तापरिवर्तन घडलेले असेल. यावेळी काँग्रेसला संधी द्या असे आवाहन मी येथील जनतेला केले आहे. सोनिया गांधी यांनीच तेलंगणाच्या निर्मितीचे आश्वासन दिले होते. त्यांनी ते पाळले आहे. इतर आश्वासनेही अशीच पाळण्यात येतील, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article