महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘डायनासोर’ प्रमाणे काँग्रेस होईल नष्ट !

07:00 AM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेस पक्षाची वाटचाल ज्या प्रकारे होत आहे, ते पाहता, पुरातन काळी ज्या प्रकारे डायनासोर नष्ट झाले, तशीच काँग्रेसही नष्ट होईल, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंग यांनी केले आहे. उत्तर प्रदेशात लखीमपूर खिरी लोकसभा मतदारसंघातील प्रचारसभेत भाषण करीत होते. ही प्रचारसभा केंद्रीय मंत्री अजय कुमार मिश्रा आणि उमेदवार रेखा वर्मा यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आली होती. मिश्रा खिरी मतदारसंघातून तर वर्मा या धौराऱ्हा मतदारसंघातून निवडणुकीच्या संग्रामात आहेत. या दोन्ही मतदारसंघांसाठी ही संयुक्त सभा होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या काळात भारताने सीमासुरक्षा, संरक्षण, अर्थव्यवस्था आणि विकास या क्षेत्रांमध्ये उत्तुंग कामगिरी केली आहे. या सरकारच्या काळात जेवढा विकास झाला, तेव्हढा अन्य सरकारांच्या काळात झालेला नाही, हे आकडेवारीवरुन सिद्ध होते. काँग्रेसचे देशाबाहेरील नेते सॅम पित्रोदा यांच्या ‘वारसा  कर“ संबंधीच्या विधानावरही त्यांनी कडाडून टीका केली. काँग्रेसच्या मनात काय दडलेले आहे, हेच पित्रोदा यांनी उघड केले आहे, असा टोला त्यांनी लगावला.

Advertisement

केवळ भाजपकडूनच आश्वासनपूर्ती

Advertisement

दिलेली आश्वासने वेळेत पूर्ण करणारा केवळ भारतीय जनता पक्षच आहे. भगवान रामलल्लांचे भव्य मंदीर निर्माण करण्याचे आश्वासन भारतीय जनता पक्षाने दिले होते. ते आता पूर्ण झाले आहे. भगवान रामलल्लांचा वनवास संपून आता त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. काश्मीरला भारतापासून वेगळे मानणारा घटनेतील 370 हा अनुच्छेद निष्प्रभ करण्याचे महत्वाचे कार्य आमच्याच पक्षाने केले आहे. लवकरच देशात समान नागरी संहिताही लागू करण्यात येईल. अन्य कोणत्याही पक्षाला हे करता येणे शक्य नव्हते, असे प्रतिपादन त्यांनी केले.

जागतिक प्रभावात वाढ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा प्रभाव जगात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताच्या शब्दांना मोठे मूल्य प्राप्त झाले आहे. भारताच्या गेल्या दहा वर्षांमधील कणखर धोरणांमुळेच हे शक्य झाले असून भविष्यातही आमचे सरकार अशीच प्रगती करेल, अशी मांडणी त्यांनी केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article