For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस विरुद्ध प्रादेशिक पक्ष

06:24 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस विरुद्ध प्रादेशिक पक्ष
Advertisement

? या संघर्षात तीन उपप्रकार आहेत. एक, काँग्रेस विरुद्ध विरोधी पक्षांच्या आघाडीतीलच प्रादेशिक पक्ष, दोन काँग्रेस विरुद्ध भारतीय जनता पक्षाच्या आघाडीतील प्रादेशिक पक्ष आणि तीन, काँग्रेस विरुद्ध कोणत्याही आघाडीत नसलेले प्रादेशिक पक्ष. अशा एकंदर मतदारसंघांची संख्या 50 ते 60 आहे.

Advertisement

? काँग्रेस विरुद्ध विरोधी पक्ष आघाडीतीलच पक्ष अशाही लढती या निवडणुकीत पहावयास मिळत आहेत. केरळमध्ये काँग्रेस डाव्या आघाडीशी लढत आहे. ही लढाई तर भारतीय जनता पक्ष विरुद्ध काँग्रेस या संघर्षापेक्षाही तीव्र असल्याचे पहावयास मिळते. पंजाबमध्ये काँग्रेस सर्व 13 जागांवर आपल्याच आघाडीचा पक्ष असणाऱ्या आम आदमी पक्षाशी लढत आहे. दिल्लीत मात्र त्यांची युती आहे. तसेच डाव्या पक्षांशी अन्य राज्यांमध्ये काँग्रेसची युती झालेली दिसून येते.

? भारतीय जनता पक्षाच्या आघाडीत असलेले प्रमुख प्रादेशिक पक्ष शिवसेना (महाराष्ट्र), राष्ट्रवादी काँग्रेस (महाराष्ट्र), संयुक्त जनता दल (बिहार), अपना दल (उत्तर प्रदेश), आसाम गण परिषद (आसाम), निधर्मी जनता दल (कर्नाटक), पट्टली मक्कळ काची (तामिळनाडू) आणि ईशान्य भारतातील काही छोटे पक्ष हे आहेत. या पक्षांपैकी अनेकांशी काँग्रेसची लढत होत असून अशा मतदारसंघांची संख्या साधारणत: 30 इतकी असल्याचे सध्याच्या स्थितीवरुन दिसून येते.

Advertisement

? काँग्रेस विरुद्ध कोणत्याही युतीत नसलेले प्रादेशिक पक्ष अशी लढत आंध्र प्रदेश आणि ओडीशा या राज्यांमध्ये प्रामुख्याने पहावयास मिळते. पश्चिम बंगाल मध्ये विरोधी पक्षांची आघाडी नाही, असे तृणमूल काँग्रेसने घोषित करुन टाकले आहे. त्यामुळे केवळ या राज्याचा विचार करता काँग्रेस कोणत्याही युतीत नसलेल्या तृणमूल पक्षाशी लढत देत आहे. असे विचित्र प्रकार या निवडणुकीत आहेत.

Advertisement
Tags :

.