रशियन तेल खरेदीप्रकरणी काँग्रेसकडून मोदी सरकार लक्ष्य
नवी दिल्ली :
भारताकडून होत असलेल्या रशियन कच्चे तेलाच्या आयातीचा मुद्दा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कडून मागील 5 दिवसांमध्ये तीनवेळा उपस्थित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची अमेरिकेच्या अध्यक्षांसोबत फोनवरुन चर्चा झाली नसल्याचा विदेश मंत्रालयाचा दावा ट्रम्प यांनी फेटाळल्याचे म्हणत काँग्रेसने मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. ट्रम्प पुन्हा पुन्हा अशाप्रकारचा दावा करणार असल्याचे काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.भारताने रशियाकडून कच्च्या तेलाची आयात बंद करण्याचे आश्वासन मिळाले असल्याचे ट्रम्प यांचे सांगणे आहे. तर भारतीय विदेश मंत्रालयाने अशाप्रकारची कुठलीच चर्च झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
परंतु ट्रम्प यांनी भारतीय विदेश मंत्रालयाचा दावाच नाकारला आहे. बाजारपेठेच्या स्थितीनुरुप ऊर्जा खरेदीच्या स्रोतांनाव्यापक आणि विविध करत असल्याचे भारताने सांगितले होते असा दावा ट्रम्प यांनी केला आहे.