काँग्रेसची आपबरोबर जागावाटप अंतिम टप्प्यात! दिल्ली, हरियाणा, गुजरात, गोव्यामधील जागावाटपावर शिक्कामोर्तब
इंडिया आघाडीमध्ये पुन्हा एकदा ऐक्य निर्माण होण्यासाठी, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने आज दिल्ली, हरियाणा, गोवा आणि गुजरात या राज्यांमध्ये आम आदमी पार्टी (आप) सोबत जागा वाटपाचा निश्चित केलं आहे. काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश मधील जागावाटपावर शिक्कामोर्तब केल्यावर लगेच यावर निर्णय घेण्यात आला. उत्तर प्रदेशात सपा 63 जागा लढवणार देणार असून काँग्रेस 17 जागांवर भाजपला आव्हान देणार आहे.
आप बरोबर दिल्लीमध्ये झालेल्या जागावाटपाच्या मुद्यावर काँग्रेसने चर्चा केली. दिल्लीतील सातपैकी चार जागा आपच्य़ा वाट्याला गेल्या असून उर्वरित तीन जागा काँग्रेसच्या पदरात पडल्या आहेत. या तीन मतदार संघामध्ये चांदणी चौक, ईशान्य दिल्ली आणि पूर्व दिल्ली या मतदार संघाचा समावेश आहे.
सध्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या हरियाणा राज्यातील 10 जागांपैकी काँग्रेस 9 जागांवर काँग्रेसचा दावा असून त्यापैकी एक जागा 'आप'ला देण्यावर एकमत झाले आहे.
गुजरातमध्ये लोकसभेच्या एकूण २४ जागा असून काँग्रेसने आपसोबत 2 जागा वाटून देण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी एक जागा भरुच आहे तर दुसऱ्या जागेचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही. 2019 च्या निवडणुकीत भाजपने गुजरातमधील सर्व 26 जागा जिंकल्या होत्या.
n गोव्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत आणि AAP ने बेनौलिमचे आमदार व्हेंझी व्हिएगास यांना उमेदवारी दिल्यानंतर दक्षिण गोवा मतदारसंघासाठी आधीच उमेदवार उभा केला आहे.
बिहारमधील जनता दल-युनायटेड आणि उत्तर प्रदेशमधील राष्ट्रीय लोकदल यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएशी हातमिळवणी केल्यानंतर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला अलीकडेच दोन मोठे धक्के बसले आहेत. काँग्रेसने जागा वाटप करारात विलंब केला तर त्याचा मोठा फटका इंडिया आघाडीला बसू शकतो असा अंदाज व्यक्त केला जात होता. राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा शेवटच्या टप्प्यात असताना, काँग्रेसने उत्तर प्रदेश आणि हरियाणा राज्यांमध्ये जागावाटप करून त्याला अंतिम स्वरूप दिले. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जागावाटप होत असून बिहारमध्ये लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी बरोबर जागावाटपावर एकमत झाल्याचं दिसत आहे.