For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला भगव्याची आठवण

11:26 AM Apr 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला भगव्याची आठवण
Advertisement

जगदीश शेट्टर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल : बैलहोंगल तालुक्यात प्रचार

Advertisement

बेळगाव : एरवी भगव्या रंगाची काविळ असणाऱ्या काँग्रेसला निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भगव्याची आठवण झाली आहे. पाकिस्तानचे उदात्तीकरण करणारे काँग्रेस पदाधिकारी आता मात्र भगवी शाल घालून प्रचार करताना दिसत आहेत. परंतु नागरिकांचा काँग्रेसवर विश्वास नसून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपलाच संधी देतील, असा विश्वास भाजपचे लोकसभा उमेदवार व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांनी व्यक्त केला. जगदीश शेट्टर यांनी बुधवारी बैलहोंगल विधानसभा मतदारसंघात जोरदार प्रचार केला. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले. बैलहौगल येथील मूरसावीर मठाधीशांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. माजी आमदार विश्वनाथ पाटील यांच्या घरी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर रामलिंगेश्वर मंदिर, सुखदेवानंद मठाला भेट देऊन स्वामीजींचा आशीर्वाद घेतला. यावेळी राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, माजी खासदार मंगला अंगडी, विधानपरिषद माजी सदस्य महांतेश कवटगीमठ यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Tags :

.