महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुर्जरबहुल 30 जागांवर काँग्रेसची उडाली झोप

05:02 AM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राजस्थानात आज मतदान होणार आहे. याचदरम्यान गुर्जर मतांसाठी राज्यात काँग्रेस आणि भाजप यांच्यात जबरदस्त चढाओढ दिसून येत आहे. काँग्रेसमध्ये सचिन पायलट यांच्यासोबत जे घडले ते कुणापासूनच लपून राहिलेले नाही, तरीही पायलट हे अद्याप काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. परंतु राज्यातील सुमारे 30 गुर्जरबहुल मतदारसंघांमध्ये काँग्रेसला गुर्जरांचा पाठिंबा मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. गुर्जरांची काँग्रेसवर असलेली नाराजी पाहता त्यांची मते मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदींनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात काँग्रेसवर एक आरोप केला आहे. काँग्रेस पक्ष राजेश पायलट यांच्याविषयी असलेल्या दुस्वासापोटी सचिन पायलट यांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा दावा मोदींनी केला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसने आरक्षण आंदोलनादरम्यान मारले गेलेल्या गुर्जरांप्रकरणी भाजपने माफी मागावी असे म्हटले आहे. राजस्थानात आता राजेश पायलट यांचा मुद्दा जोर पकडू लागला आहे, यामुळे काँग्रेसला सातत्याने स्पष्टीकरण द्यावे लागत आहे. सचिन पायलट यांनीही पंतप्रधान मोदींचा दावा चुकीचा असल्याचे म्हटले आहे. तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पत्रकार परिषद घेत पायलट यांच्या मुद्द्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Advertisement

जर कुणी खरं बोलले आणि यामुळे गांधी परिवाराला असुविधा झाल्यास संबंधिताचे राजकारण ख•dयात गेल्याचा काँग्रेसचा इतिहास आहे. काँग्रेसमध्ये गांधी परिवाराच्या विरोधात उभे राहणाऱ्याला राजकीयदृष्ट्या उदध्वस्त केले जाते. राजेश पायलट यांनी काँग्रेसच्या या परिवाराला आव्हान दिले होते, या परिवाराने राजेश पायलट यांना शिक्षा तर दिलीच, आता त्यांचे पुत्र सचिन पायलट यांनाही ते त्रास देत आहेत असा दावा मोदींनी केला होता.

राजेश पायलटांसोबत  काय घडले?

राजीव गांधी यांचे मित्र राजेश पायलट हे सदैव काँग्रेसमध्ये राहिले. 1997 मध्ये त्यांनी गांधी परिवाराचे समर्थनप्राप्त असलेल्या उमेदवाराच्या विरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती. पायलट यांना यात यश मिळाले नव्हते. यानंतर 2000 साली काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जितेंद्र प्रसाद यांनी सोनिया गांधी यांच्या विरोधात लढविली होती. या निवडणुकीपूर्वीच राजेश पायलट यांचा रस्ते दुर्घटनेत मृत्यू झाला हाता. या दुर्घटनेवरून अनेक प्रकारचे संशय व्यक्त केले जातात. यानंतर काही महिन्यांनी जितेंद्र प्रसाद यांचेही निधन झाले होते.

काँग्रेसकडून प्रत्युत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप फेटाळण्यासाठी काँग्रेस आता आक्रमक झाला आहे. प्रथम सचिन पायलट यांनी व्हिडिओ जारी करत पंतप्रधान मोदींना खोटे ठरविले. पंतप्रधान मोदींचे वक्तव्य हे सत्यापासून खूपच दूर होते. माझे वडिल राजेश पायलट यांनी इंदिरा गांधी यांच्याकडून प्रेरणा घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. पंतप्रधानांनी माझ्या भवितव्याबद्दल चिंता करू नये असे सचिन पायलट यांनी या व्हिडिओत म्हटले आहे. तर काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनीही पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. राजेश पायलट यांनी काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती, तेव्हा सोनिया गांधी किंवा गांधी परिवाराचा कुठलाही सदस्य सक्रीय राजकारणात नव्हता. मोदींनी राजेश पायलट आणि काँग्रेससंबंधी असत्य विधाने करण्याऐवजी गुर्जर समुदायाची माफी मागावी. भाजपच्या शासनकाळात 72 गुर्जर युवक मारले गेले होते असे पवन खेडा यांनी म्हटले आहे.

भाजपची मोठी तयारी

राजस्थानात सुमारे 30 मतदारसंघ गुर्जरबहुल आहेत. याचबरोबर आणखी 20 मतदारसंघांमध्ये गुर्जर मतदारांची संख्या लक्षणीय आहे. 2018 मध्ये सचिन पायलट हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असताना काँग्रेसला गुर्जरबहुल मतदारसंघांमध्ये चांगले यश मिळाले होते. काँग्रेसच्या वतीने एकूण 8 गुर्जर आमदार निवडून आले होते. तर भाजपच्या सर्व गुर्जर उमेदवारांना पराभव पत्करावा लागला होता. यावेळी काँग्रेसने 11 तर भाजपने 10 गुर्जर नेत्यांना उमेदवारी दिली आहे. जानेवारी महिन्यात पंतप्रधान मोदींनी भीलवाडामध्ये गुर्जरांची देवता देवनारायण भगवान यांच्या 1111 व्या अवतारम महोत्सवात भाग घेतला होता. दुसरीकडे गुर्जर आरक्षण आंदोलनाशी संबंधित गुर्जर नेते दिवंगत किरोडी सिंह बैंसला यांचे पुत्र विजय सिंह बैंसला हे भाजपच्या वतीने निवडणूक लढवत आहेत. याचमुळे अनेक गुर्जरबहुल मतदारसंघांमध्ये ‘पायलट तुझसे बैर नहीं, पर काँग्रेस तेरी खैर नही, पायलट के गद्दारों को, गोली मारो’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जात आहेत. याचमुळे काँग्रेसची झोप उडाली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article