काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचे निधन
12:13 PM Jul 15, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी । प्रतिनिधी
Advertisement
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सावंतवाडी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विकास भालचंद्र सावंत ( ६२ ) यांचे मंगळवारी सकाळी १० .३० वाजण्याच्या सुमारास निधन झाले . त्यांच्या पश्चात मुलगा विक्रांत , नातू , भाऊ , भावजय , पुतणे असा परिवार आहे . विकास सावंत माजगाव येथील आपल्या निवासस्थानी होते . सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले . परंतु ,तत्पूर्वीच त्यांचे निधन झाले . सावंत हे माजी मंत्री कै .भाईसाहेब सावंत यांचे पुत्र होत .त्यांनी जिल्हा बँक संचालक , राज्य सहकारी बँक संचालक,जिल्हा परिषद सभापती म्हणून काम केले होते . अभ्यासू नेतृत्व म्हणून त्यांची ख्याती होती . त्यांच्यावर बुधवारी दुपारी १२ वाजता सावंतवाडी येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत .
Advertisement
Advertisement