महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मांद्रे काँग्रेस गट समितीतर्फे काँग्रेस स्थापना दिवस साजरा

11:38 AM Dec 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हरमल : येथील मांद्रे काँग्रेस गट समितीतर्फे काँग्रेस स्थापना दिवस हरमल येथे साजरा करण्यात आला. यावेळी उत्तर गोवा काँग्रेसचे उपाध्यक्ष मींगेल फर्नांडिस यांच्या हस्ते ध्वजरोहण झाले. या कार्यक्रमात मांद्रे काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष नारायण रेडकर यांनी स्वागत केले व स्थापना दिवसाचे महत्त्व पटवून दिले. भारत देश व गोवा राज्यात काँग्रेसचा स्थापना दिवस साजरा केला जाईल. त्यादृष्टीने मतदारसंघातील सुरेश सावंत (केरी) व अनंत नाईक (पार्से) यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन हरमलचे माजी सरपंच तथा काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र (बाबी) केरकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. काँग्रेस पक्षाच्या स्थापनेस 138 वर्षे झाली असून पक्षासाठी अनेक ज्येष्ठ व थोर स्वांतत्र्यसेनानीनी असीम त्याग व बलिदान दिले त्याचे स्मरण व कार्याची प्रेरणा घेऊन पक्षासाठी राबले पाहिजे. गोवा राज्यात काँग्रेस पक्षाला अनेक समस्या असून, मतदार पक्षापासून दूर जात आहेत. परंतु कार्यकर्त्यांनी विचलित न होता पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे व सत्तेवर येईपर्यंत झटले पाहिजे, असे मत ज्येष्ठ कार्यकर्ते रामचंद्र केरकर यांनी व्यक्त केले. यावेळी मांद्रे गट समितीचे अध्यक्ष नारायण रेडकर यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. यावेळी बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article