महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसला धक्का! माजी उमरगा युवक काँग्रेस शहराध्यक्षाचा शिवसेनेत प्रवेश

05:17 PM Jan 08, 2024 IST | Abhijeet Khandekar
ShivSena
Advertisement

उमरगा प्रतिनिधी

माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या नेतृत्व मान्य करत रविवार (दि.७) रोजी किरण गायकवाड यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन माजी उमरगा युवक काँग्रेस शहराध्यक्ष आयुब लदाफ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला.

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये उमरगा युवक काँग्रेस माजी शहराध्यक्ष आयुब लदाफ यांनी जाहीर प्रवेश केला. आयुब लदाफ यांच्यासोबत शरीफ बानकर, आरिफ शेख, अब्दुल बागवान, फारूक शेख, कैफ जमादार, अलीम लदाफ, इस्माईल शेख, इरफान मुल्ला, तौफीक मुल्ला, अल्ताफ शेख, असलम लदाफ, फयाज जमादार, अहेमद शेख, मुस्ताक शेख, अजीम शेख, उमर शेख, अतिक लदाफ यांच्यासह काँग्रेसच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.

Advertisement

मराठवाडा युवासेना निरीक्षक किरण गायकवाड यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश पार पडला. यावेळी शिवसेना पक्षाच्या माध्यमातून शहरी भागातील सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सोडवाल व शिवसेना पक्ष संघटना बळकट कराल, असा विश्वास किरण गायकवाड यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :
city president Shiv SenacongressFormer Umarga Youth Congresstarun bharat news
Next Article