महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसचा जनतेच्या संपत्तीवर डोळा

04:46 PM Apr 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे यांचा आरोप : काँग्रेसची रणनीती हाणून पाडण्याचे केले आवाहन

Advertisement

पणजी : तुमच्या-आमच्या वाडवडिलांची संपत्ती, पैशांवर डोळा ठेवणाऱ्या काँग्रेस पक्षाने कुटील डाव आखताना एखाद्या कुटुंबातील प्रमुखाच्या निधनानंतर त्याच्या संपत्तीचा मोठा वाटा शासनाकडे जमा करण्याच्या दृष्टीने वारसा कर (इनहॅरिटन्स टॅक्स) लागू करण्याची तयारी चालविली आहे. यावरून भविष्यात काँग्रेस काय करू शकते याचा अंदाज येऊ शकतो. त्यामुळे देशाची सत्ता नेतृत्वहीन अशा ‘इंडी’ आघाडीकडे सोपवायची की भक्कम, सशक्त, विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या कणखर नेतृत्वाकडे सोपवायची, याचा निर्णय जनतेने घेतला पाहिजे, असे मत भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी व्यक्त केले आहे. काल गुऊवारी पणजीत भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी गोवा प्रदेश सरचिटणीस अॅड. नरेंद्र सावईकर आणि प्रवक्ते गिरिराज पै वेर्णेकर यांची उपस्थिती होती.

Advertisement

संविधानाबाबत काँग्रेस दुतोंडी

पुढे बोलताना तावडे यांनी सांगितले की, एकीकडे संविधानात बदल करण्यासाठी भाजपाला 400 पार जागा हव्या आहेत, अशी खोटी माहिती पसरवून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी जनतेच्या मनात भीती पसरवत आहेत, तर दुसऱ्या बाजूने त्यांचेच नेते गोव्याला विशेष दर्जा देण्यासाठी राहुल गांधी यांच्या संमतीने संविधानात बदल करणार असल्याचे सांगत आहेत, हा दुतोंडीपणा जनतेने ओळखला पाहिजे, असा इशारा त्यांनी दिला.

हा तर काँग्रेसचा कुटील डाव

तुमच्या-आमच्या वाडवडिलांची संपत्ती, पैशांवर डोळा असल्यानेच काँग्रेसकडून वारसा कर लादण्याचा कुटील डाव आखला जात आहे. हे पैसे कोणाला मिळणार याचे संकेत माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी दिलेले आहेत. काँग्रेसचा हा कुटील डाव आहे. दुसरीकडे मोदी सरकार ठोस योजना राबवून त्याची रक्कम थेट लाभार्थींच्या खात्यात वळवत आहे.

अर्थसहाय्य जनतेच्या बँक खात्यात

आयुष्मान कार्डाच्या माध्यमातून भाजपा सरकारने 5 लाख ऊपयांपर्यंतचा आरोग्य विमा, जलजीवन मिशनतर्फे 100 टक्के घरांना पाणी, स्टार्ट अप, पीएम उज्ज्वला योजनेद्वारे 10 लाख एलईडी बल्ब, मातृवंदना, स्वच्छ भारत, किसान सन्मान योजनेखाली 6 हजार ऊपये यासारख्या कित्येक योजनांच्या माध्यमातून जनेतला आर्थिक साहाय्य केले आहे, असे तावडे यांनी सांगितले.

बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसने पाडले

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्याकाळी भंडारा मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी देऊन काँग्रेसने पराभूत करण्याचे काम केले. याऊलट भाजपाने 14 एप्रिल रोजी आंबेडकर जयंती दिनी संविधानाची प्रत समोर ठेऊन आपला जाहीरनामा (संकल्पपत्र) प्रसिद्ध केला, असे तावडे म्हणाले.

विरियातोंच्या विधानावर राहुल गांधींची चुप्पी का?

विरोधकांकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मुद्देच नाहीत. त्यामुळे ते  फसतात. काँग्रेसच्या दक्षिण गोव्यातील उमेदवाराने संविधानाविषयी केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, यावरून जनतेने काय समजावे, असे सांगून तावडे यांनी, तीच तर काँग्रेसची नीती आहे, अशी टीका केली.

तामिळनाडू, केरळातही भाजपला भरपूर जागा

दक्षिण भारतात तामिळनाडू, केरळमध्ये भाजपला भरपूर जागा मिळतील, असे वातावरण आहे, असे त्यांनी सांगितले. एखाद्या निवडणुकीतील विजयात खरा वाटा असतो तो बूथ कार्यकर्त्यांचा. त्यामुळे त्याचे श्रेयही या कार्यकर्त्यांचेच असते. त्यानंतर मग स्थानिक आणि राष्ट्रीय नेतृत्वाचा त्यात वाटा असतो, असे तावडे यांनी स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या फेरीत कमी प्रमाणात झालेल्या मतदानाचा भाजपवर परिणाम होईल का, असे विचारले असता, त्या दिवशी प्रचंड उकाडा असल्यामुळे लोक मतदानासाठी बाहेर पडले नाहीत, मात्र त्याचा भाजपवर काहीही परिणाम होणार नाही, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article