कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसने भाजपच्या पणजी कार्यालयात वाटले लाडू!

12:29 PM May 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : केंद्रातील भाजप सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचे जाहीर केल्याने गोवा प्रदेश काँग्रेस समितीने आनंदीत होऊन राजधानी पणजी शहरातून फेरी काढली आणि भाजपच्या पणजीतील मुख्यालयात जाऊन लाडू वाटले. पण तेथील कुणीच ते लाडू स्वीकारले नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची हिच मागणी होती. तीच शेवटी भाजप सरकारने मान्य केली, हा काँग्रेससह देशातील जनतेचा विजय असल्याचा दावा गोव्यातील काँग्रेस नेत्यांनी भाजप कार्यालयासमोर केला. हा आनंदोत्सव साजरा करत असताना लाडूंचे वाटपही केले. प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार कार्लुस फेरेरा तसेच काँग्रेसचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी काँग्रेस भवन ते भाजप कार्यालय अशी विजयोत्सव फेरी काढली. त्यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा जयजयकार केला तसेच त्यांचे समर्थन करणाऱ्या घोषणाही दिल्या. सदर फेरी भाजप कार्यालयासमोर आली आणि तेथे छोटीशी सभा घेण्यात आली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article