कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेस कमिटी चौक अपघाताचा हॉटस्पॉट !

12:32 PM Jul 17, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली / संजय गायकवाड :

Advertisement

सांगलीतील एसटी बसेस आणि खासगी प्रवासी वाहतुकीचा महत्वाचा थांबा असणारा काँग्रेस कमिटी चौक अपघाताचा हॉट स्पॉट झाला आहे. या चौकातील आर्यलँडची जागा बदलण्याची आवश्यकता आहे. सुशोभिकरणामध्ये काही वर्षापूर्वी या चौकामध्ये बसविण्यात आलेला आर्यलँडच अपघाताला निमंत्रण ठरू लागला आहे. आयुक्त सत्यम गांधी यांनी या चौकाची प्रत्यक्ष पाहणी करून चौकाची नव्याने रचना करण्यासाठी पावले टाकावीत अशी वाहनचालक व नागरिकांतून मागणी करण्यात येत आहे.

Advertisement

सांगलीमध्ये सर्वाधिक वर्दळीचा आणि गर्दीना चौक म्हणून ज्यांची ओळख आहे. अशा चौकामध्ये सर्वात वरचा नंबर असणारा आणि सांगली मिरज रोडवरील सर्वात वाहनांची ये जा असणारा चौक म्हणून काँग्रेस कमिटी चौकाकडे पाहिले जाते. केवळ सांगली मिरज रोडव नव्हे तर उत्तर शिवाजीनगर, छत्रपती शिवाजी स्टेडीयमकडून आलेला चौक, आपटा पोलीस चौकीकडून आलेला रोड, माधवनगरकडून आलेला रोड आणि काळ्या खणीकडून आलेला रोड असे अनेक रोड येथे येऊन मिळतात. त्यामुळे या चौकामध्ये पहाटे पाचपासून ते रात्री दहापर्यंत वाहनांची मोठी गर्दी असते.

सर्व वाहनांना काँग्रेस कमिटीसमोरील चौकाला वळसा घालूनच पुढे जावे लागते. मुळातच हा चौक लहान भासू लागला आहे. शिवाय या चौकाची जागा चुकीच्या ठिकाणी झाल्याचे दिसून येते. या चौकानजीक तासगाव विटा, आटपाडी, मणेराजुरी, माधवनगर, बुधगाव, कवलापूर आदी गावाकडे ये जा करणाऱ्या सर्व एसटी बसेसचा थांबा आहे. या थांब्यावरच खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाड्याही थांबून असतात, समोरच उत्तर शिवाजीनगरच्या कमानीजवळ आणि हनुमान हॉटेलसमोर असे रिक्षाने दोन स्टॉप आहेत. याशिवाय जिथे बसेस उभ्या राहतात त्याच्या पाठीमागे खाद्यपदार्थांचे हातगाडेही उभे असतात. त्यामुळे येथे लोकांची मोठी गर्दी असते.

काँग्रेस कमिटीच्या समोर काही दिवसापुर्वी पेव्हीन ब्लॉक बसविले आहेत. येथे आता चारचाकी गाड्या उभ्या राहू लागल्या आहेत. त्यामुळे चौकातील आर्यलँडला वळसा घालून बसस्टॉपकडे जाताना एसटी बसेस चालकांना गाड्या वळविता येत नाहीत. त्यामुळे गाड़ी वळविताना जर उत्तर शिवाजीनगरच्या कमानीतून जर एखादे वाहन आले तर येथे हमखासपणे अपघात होतोच, दुसरीकडे काळया खणीकडून येणारी वाहनेही जोरात येतात. त्यात स्टेशन चौकाकडून येणारी वाहने आणि काळ्या खणीकडून येणारी वाहने यांचा चौकात अपघात होतो. आर्यलँडच्या ठिकाणी रोज एक अपघात होतो.

काँग्रेस कमिटीसमोरील चौकात तयार करण्यात आलेला आर्यलैंड आता चुकीच्या ठिकाणी बसविला आहे हे जाणवू लागले आहे. या आयलँडची जागा बदलण्याची आवश्यकता आहे. आर्यलँडला घठकून अनेकांचे अपघात होत आहेत. येथे बसेस वळू शकरा नाहीत. त्यामुळे अनेक वाहने ही वाहतुकीचे नियम तोडून कशीही पुढे जातात. त्यामुळे सध्याच्या जागेवरून काढून हा आर्यलैंड थोडासा लहान आणि काँग्रेस कमिटीच्या बाजूला सरकविण्याची आवश्यकता आहे.

                                                                                                            -राजेश नाईक माजी नगरसेवक सांगली

एका बाजूला आर्यलंडनी जागा चुकीनी झालेली असताना दुसरीकडे हनुमान हॉटेलच्या कोपऱ्यावर विजेचा मोठा ट्रान्सफॉर्मरही आहे. तोही अन्यत्र बसवावा लागेल. विजेच्या ट्रान्सफॉर्मबाबत आम्ही यापूर्वी महापालिका प्रशासन व वीज वितरणला कळविले आहे. हा ट्रान्सफॉर्मर अन्यत्र हलविला तर हा चौक आणखी रूंद होवू शकतो. आयुक्त सत्यम गांधी यांनी या नौकाची प्रत्यक्ष पाहणी करून निर्णय घ्यावा.

                                                                               -प्रा. पदमाकर जगदाळे, शहर जिल्हाध्यक्ष, अजित पवार राष्ट्रवादी

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article