महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अत्यंत साध्यापद्धतीने काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी भरला उमेदवारी अर्ज

04:47 PM Apr 18, 2024 IST | Rohit Salunke
Congress candidate Priyanka Jarkiholi filled the nomination form in a very simple manner
Advertisement

चिक्कोडी: चिक्कोडी लोकसभा मतदार संघाच्या काँग्रेस उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनी आज चिक्कोडी प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन निवडणुक अधिकारी राहुल शिंदे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला. शक्तिप्रदर्शनाला फाटा देत अत्यंत साद्यापद्धतीने प्रियांका यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम व बेळगाव जिल्हा पालक मंत्री सतीश जारकीहोळी, महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, आमदार लक्ष्मण सवदी, युवा नेते राहुल जारकीहोळी, दिल्लीचे विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी, आमदार गणेश हुक्केरी, राजू कागे, आसिफ सेठ व इतर कार्यकर्ते या वेळी सहभागी झाले होते.

Advertisement

Congress candidate Priyanka Jarkiholi filled the nomination form in a very simple manner

याप्रसंगी उमेदवार प्रियांका जारकीहोळी म्हणाल्या कि, आता दुसऱ्या स्तरातून प्रचार सुरु करण्यात येईल. आज बेळगाव जिल्ह्यातील सर्व मंत्री, आजी - माजी आमदार, विधान परिषद सदस्य व इतर नेते उमेदवारी अर्ज भरताना आपली उपस्थिती दर्शविली, त्यांचे आपण आभार मानत त्यांच्या या उपस्थितीमुळे आपल्याला आनंद झाल्याचे सांगितले. चिक्कोडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची लाट असून जनतेतून उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#belgaum#chikkodi#kpcc#lakshmihebbalkar#priyankajarkiholi#rahuljarkiholi#satishjarkiholi#tarunbharat
Next Article