महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

व्हीव्हीपॅटवर मत देण्यासाठी काँग्रेसने मागितला वेळ

06:09 AM Jan 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisement

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रावर मतदान केल्यानंतर मतदाराला आपण कोणाला मत दिले हे पाहण्याची सोय आहे. याला व्हीव्हीपॅट अशी संज्ञा आहे. या व्हीव्हीपॅटसंबंधी आपले मत व्यक्त करण्यासाठी काँग्रेसने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे भेटीसाठी वेळ मागितला आहे. आयोगाने वेळ दिल्यानंतर विरोधी पक्षांच्या आघाडीचे एक प्रतिनिधीमंडळ आयोगाच्या तिन्ही सदस्यांची भेट घेईल.

Advertisement

काँग्रेसचे प्रवक्ते जयराम रमेश यांनी यासंबंधात एक पत्र निवडणूक आयोगाला पाठविले आहे. 20 डिसेंबरला विरोधी पक्षांच्या आघाडीने आयोगाकडे वेळ मागितला होता. 19 डिसेंबरला विरोधी पक्षांच्या आघाडीची दिल्लीत बैठक झाली होती. या बैठकीत व्हीव्हीपॅट संबंधात एक प्रस्ताव संमत करण्यात आला होता. या प्रस्तावाची प्रत केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्याची या आघाडीची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही आयोगाकडे वेळ मागत आहोत, असे पत्रात सांगण्यात आले आहे.

9 ऑगस्टला निवेदन

9 ऑगस्टला विरोधी पक्षांच्या आघाडीने निवडणूक आयोगाला एक निवेदन सादर करुन व्हीव्हीपॅट यंत्रणेसंदर्भात आक्षेप नोंदविले होते. तसेच यावर चर्चा करण्यासाठी ऑगस्टच्या 9, 10, 16, 18, आणि 23 या दिनांकांना पुन्हा पत्रे पाठविली होती. या निवेदनावर आयोगाने त्याचे स्पष्टीकरण दिले होते. तथापि, हे स्पष्टीकरण मोघम स्वरुपाचे होते, असा आरोप आघाडीने केला आहे.

चर्चा करण्याची इच्छा

मतदान यंत्रे आणि व्हीव्हीपॅट यंत्रणा यांच्या संदर्भात विरोधी पक्षांच्या आघाडीला निवडणूक आयोगाशी चर्चा करायची आहे. तथापि, आयोगाने आजपर्यंत चर्चेसाठी वेळ दिलेला नाही. या इच्छेला आजवर केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रतिसादही दिलेला नाही. त्यामुळे हे पत्र पाठविल्याचे रमेश यांनी स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article