महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसकडून आणखी तीन मतदारसंघातील उमेदवार जाहीर

06:22 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कोलारमधील तिकिट वाटपाचा तिढा कायम

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने यापूर्वी 24 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. शुक्रवारी रात्री बळ्ळारी, चामराजनगर आणि चिक्कबळ्ळापूर या तीन लोकसभा मतदारसंघांतील उमेदवार जाहीर करण्यात आले. कोलार मतदारसंघातून कोणाला उमेदवारी जाहीर करावी, यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.

बळ्ळारी लोकसभा मतदारसंघातून ई. तुकाराम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर चामराजनगरमध्ये मंत्री एस. सी. महादेवप्पा यांचे पुत्र सुनील बोस यांना तिकीट देण्यात आले आहे. युवा काँग्रेस नेते रक्षा रामय्या यांना लोकसभा निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे.

कोलार मतदारसंघातून मंत्री के. एच. मुनियप्पा यांच्या जावयाला तिकीट देण्यास कोलार जिल्ह्यातील एका मंत्र्यासह चार आमदारांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे येथून कोणाला उमेदवारी जाहीर करावी, याविषयी पेच निर्माण झाला आहे. दोन-तीन दिवसांत येथील उमेदवार निश्चित केला जाण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article