कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आरक्षण मुद्यावरून संसदेत गोंधळ

06:58 AM Mar 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या वक्तव्याचे पडसाद : भाजपने मागितले काँग्रेसकडून स्पष्टीकरण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या नवव्या दिवशी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या विधानावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात सोमवारी गोंधळ झाला. भाजप सदस्यांनी कर्नाटकातील आरक्षण मुद्यावरून काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केल्याने राज्यसभा सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. सुरुवातीला सभागृह दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. कामकाज पुन्हा सुरू होताच पुन्हा गोंधळ झाल्याने कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.

संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात, संविधानाच्या मुद्यावर भाजपने काँग्रेसला जोरदार कोंडीत पकडले. सोमवारी राज्यसभेचे कामकाज सुरू होताच संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी हा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा अपमान केला असल्याचा आरोप रिजिजू यांनी केला. त्यावर मल्लिकार्जुन खर्गे यांनी बाबासाहेबांचे संविधान कोणीही बदलू शकत नाही. आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. हे सुरक्षित करण्यासाठी आम्ही भारत जोडो यात्रा आयोजित केली. तुम्ही भारत तोडत आहात, असा शाब्दिक प्रतिहल्ला केला.

जे. पी. नड्डा यांनीही केला हल्लाबोल

काँग्रेस पक्ष संविधानाचा रक्षक असल्याचा दावा करतो. धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, असे बाबासाहेबांनी स्पष्टपणे म्हटले आहे. परंतु काँग्रेस सरकारने दक्षिणेतील मुस्लिमांसाठी सरकारी टेंडरमध्ये चार टक्के आरक्षणाची तरतूद केली आहे. कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी तिथल्या सभागृहात गरज पडल्यास आपण संविधान बदलू असे वक्तव्य केले आहे. त्यांच्याकडून राज्यघटनेचे तुकडे करण्याचा प्रयत्न झाला आहे. विरोधी पक्षनेत्यांनी याचे उत्तर द्यावे, असे राज्यसभेतील सभागृह नेते जे. पी. नड्डा म्हणाले.

डी. के. शिवकुमार यांचे स्पष्टीकरण

कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी 23 मार्च रोजी कर्नाटकातील मुस्लीम आरक्षणाच्या मुद्यावर एका कार्यक्रमात संविधान बदलणार असल्याचे म्हटले होते. या विधानाचे पडसाद सोमवारी संसदेत उमटले. सभागृहात या मुद्यावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी वाढल्या असतानाच कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनीही आपल्या विधानावर स्पष्टीकरण दिले. ‘मी संविधान बदलण्याबद्दल बोललो नाही. भाजपचे नेते चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे’, असे बोल सुनावले.

लोकसभेतही वादावादी

भाजपने सोमवारी लोकसभेतही मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. समाजवादी पक्षाचे खासदार पोस्टर घेऊन सभागृहात आले. यावर सभापती ओम बिर्ला यांनी आक्षेप घेत सभागृहाचे कामकाज 12 वाजेपर्यंत तहकूब केले. दुपारी 12 वाजता सभागृह पुन्हा सुरू झाले, तेव्हा रिजिजू सभागृहात पोहोचले आणि कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली. यावर गोंधळ झाल्याने सभागृहाचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. दुपारनंतर सभागृह पुन्हा सुरू झाल्यानंतर 2025 च्या अर्थसंकल्पावर चर्चा सुरू झाली.

काँग्रेससाठी हा मोठा धक्का?

लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसने भाजपवर आरोप केला होता की जर भाजप सत्तेत आला तर ते संविधान बदलेल. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक वेळा संविधानाच्या प्रतीवरून भाजपला घेरत काँग्रेस संविधानाशी कोणतीही छेडछाड सहन करणार नाही. पण आता डी. के. शिवकुमार यांच्या या विधानामुळे काँग्रेससाठी अडचणी वाढत असल्याचे दिसून येत आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article