महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मराठा मंडळमध्ये तंबाखू निषेध दिनाचे आचरण

06:30 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

मराठा मंडळाच्या पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री विभागाच्या तंबाखू नियंत्रण कक्षतर्फे इंडियन डेंटल असोसिएशनच्या सहकार्याने तंबाखू निषेध दिन आचरण्यात आला. यावेळी स्मोकर लायझर या उपकरणाचे उद्घाटन प्राचार्य रमाकांत नायक यांच्या हस्ते करण्यात आले.

Advertisement

यानंतर शाहूनगर येथील शिवालयमध्ये दंततपासणी शिबिर घेण्यात आले. यावेळी डॉ. सुजाता ब्याहट्टी यांनी तंबाखूचे दुष्परिणाम तर डॉ. रेखा कत्ते यांनी मौखिक आरोग्य कसे राखावे? याबद्दल मार्गदर्शन केले. आयडीएच्या सचिव डॉ. नेत्रा सबनीस, नगरसेवक श्रेयस नाकाडी, सामाजिक कार्यकर्त्या शीला गडकरी व शिवालय मंदिराचे विश्वस्त अंगडी व एस. ए. कदम यावेळी उपस्थित होते.

मंडळाच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू यांनी तंबाखू नियंत्रण कक्ष उत्तम कामगिरी करत असल्याबद्दल अभिनंदन केले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article