For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ज्योतिरादित्य सिंधिया यांना मातृशोक

06:29 AM May 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
ज्योतिरादित्य सिंधिया यांना मातृशोक
Advertisement

राजमाता माधवी राजे सिंधिया यांचे निधन : एम्समध्ये सुरु होते उपचार

Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ, नवी दिल्ली

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिय यांना मातृशोक झाला आहे. दिल्लीतील एम्समध्ये राजमाता माधवी राजे सिंधिया यांचे बुधवारी सकाळी 9.28 वाजता निधन झाले आहे. मागील तीन महिन्यापासून त्यांच्यावर एम्समध्ये उपचार सुरू होते, तर मागील काही दिवसांपासून त्या व्हेंटिलेटरवर होत्या. माधवी राजे यांच्यावर ग्वाल्हेर येथे गुरुवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. माधवी राजे यांच्या निधनाचे वृत्त कळताच अनेक नेत्यांनी दु:ख व्यक्त केले आहे.

Advertisement

राजमाता माधवी राजे या मूळच्या नेपाळच्या होत्या. त्या नेपाळच्या राजघराण्याशी संबंधित होत्या. त्यांचे आजोबा जुद्ध शमशेर बहादुर हे नेपाळचे पंतप्रधान होते. 1966 मध्ये माधवराव सिंधिया यांच्यासोबत माधवी राजे यांचा विवाह झाला होता. विवाहापूर्वीचे त्याचे नाव राजकन्या किरण राजलक्ष्मी देवी होते. माधवी राजे यांचे पती आणि माजी केंद्रीय मंत्री माधवराव यांचा 30 सप्टेंबर 2001 रोजी दुर्घटनेत मृत्यू झाला होता.

मार्च 2000 साली सिंधिया राजघराण्याचे प्रमुख ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला माधवी राजे यांच्याकडून मोठे समर्थन मिळाले हेते. ज्योतिरादित्य हे राजमाता माधवी राजे यांच्याशी कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी सल्लामसलत करत होते. माधवी राजे यांनी स्वत:ला सक्रीय राजकारणापासून दूर ठेवले होते.

Advertisement
Tags :

.