बालसंस्कार शिबिराची सांगता
बेळगाव : दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर,शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व सव्यसाची गुरुकुलम यांच्यावतीने मागील आठ दिवस शिवकालीन युद्धनीती व स्वसंरक्षण यांचे लाठी-काठी व धर्मशिक्षणाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराची सांगता धर्मवीर संभाजी उद्यान येथे पार पडली. प्रमुख वक्ते म्हणून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे इचलकरंजी प्रमुख महाजन गुरुजी उपस्थित होते. व्यासपीठावर श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, विश्व हिंदू परिषदेचे विजय जाधव, संगम कक्केरी, आरएसएसचे श्रीकांत कदम, राजू कणबरकर, नंदकुमार पाटील, माजी महापौर महेश नाईक, भारतीय सैन्यदलाचे शाम मडिवाळ, गागा भट्ट यांचे वंशज गणेश कुलकर्णी, अॅड. शामसुंदर पत्तार, प्रताप यादव, कपिलेश्वर मंदिरचे अध्यक्ष राहुल कुरणे, अजित जाधव, राजू भातकांडे, विवेक पाटील, अनिल मुतगेकर, प्रसाद बाचूळकर उपस्थित होते. विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या हस्ते पाद्यपूजन करण्यात आले. कपिलेश्वर मंदिरमध्ये आरती करून बालसंस्कार शिबिराची सांगता करण्यात आली. स्वागत व प्रास्ताविक शिबिराच्या संचालिका साक्षी पाटील यांनी केले. अभिजीत चव्हाण यांनी आभार मानले.