महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सहाव्या टप्प्यातील प्रचाराची सांगता

07:10 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आठ राज्ये-केंद्रशासित प्रदेशांमधील 58 मतदारसंघांमध्ये उद्या मतदान : 889 उमेदवार रिंगणात

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्याच्या प्रचारतोफा गुरुवारी थंडावल्या. शनिवार, 25 मे रोजी आठ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 58 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. या क्षेत्रांमध्ये बिहारमधील 8 जागा, हरियाणातील सर्व 10 जागा, जम्मू-काश्मीरमधील 1 जागा, झारखंडमधील 4, दिल्लीतील सर्व 7 जागा, ओडिशातील 6, उत्तर प्रदेशातील 14 आणि पश्चिम बंगालमधील 8 जागांचा समावेश आहे. या टप्प्यात एकूण 889 उमेदवार रिंगणात आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. लोकसभेच्या 543 जागांपैकी पाचव्या टप्प्यापर्यंत 428 जागांवर मतदान पूर्ण झाले आहे. आता शनिवारी 58 जागांवर मतदान झाल्यानंतर सातव्या म्हणजेच अंतिम टप्प्यात 57 जागांसाठी मतदान होईल. सहाव्या टप्प्यात 58 जागांसाठी 889 उमेदवार रिंगणात आहेत. मतदान सकाळी 7 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळी 6 वाजता संपेल.

सहाव्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते धर्मेंद्र प्रधान, भाजप नेते भर्तृहरी महताब, अपराजिता सारंगी, संबित पात्रा, बीजेडी संघटनेचे सरचिटणीस प्रणव प्रकाश दास यांच्यासह अनेक दिग्गजांच्या महत्त्वपूर्ण निवडणूक लढती रंगणार आहेत. या टप्प्यातील प्रचाराच्या अंतिम दिवशी पंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी पंजाबमधील पटियाला शहरात पक्षाच्या सभेला संबोधित केले. या रॅलीसाठी पोलो मैदान आणि परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. या सभेपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने काहीवेळ गोंधळ निर्माण झाला होता. दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागांसाठीही गुरुवारी संध्याकाळी प्रचाराची सांगता झाली. याचदरम्यान रोड शो, जाहीर सभा आणि घरोघरी प्रचाराच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्ष कोणतीही कसर सोडत नाहीत. देशाच्या राजधानीत सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी मतदान होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी पश्चिम दिल्ली लोकसभेच्या द्वारका भागात जाहीर सभेला संबोधित केले. तर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी पश्चिम दिल्लीतील नजफगढ भागात रोड शो केला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनीही चांदनी चौक लोकसभा मतदारसंघातील अशोक विहार परिसरात रोड शो केला. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघातील दिलशाद गार्डन परिसरात जाहीर सभा घेतली. याप्रसंगी त्यांनी देशात गरिबी आणि असमानता कायम ठेवल्याबद्दल भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारवर त्यांनी जोरदार टीका केली.

 ओडिशात विधानसभेसाठी मतदान

सहाव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या ओडिशातील सहा लोकसभा मतदारसंघांसाठीचा प्रचार गुरुवारी संध्याकाळी संपला आहे. संबलपूर, केओंझार, ढेंकनाल, पुरी, भुवनेश्वर आणि कटक लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या 42 विधानसभा मतदारसंघांमध्ये शनिवारी सार्वत्रिक निवडणुकांबरोबरच राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. याचदरम्यान, भाजपचे अध्यक्ष जे. पी. न•ा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी गुरुवारी ओडिशामध्ये भाजपच्या उमेदवारांसाठी जाहीर सभांना संबोधित केले. त्यांनी सर्व आघाड्यांवर राज्याला पिछाडीवर टाकल्याबद्दल बीजेडीच्या नेतृत्वाखालील नवीन पटनायक सरकारवर टीका केली. तसेच ओडिशात भाजपला सरकार स्थापन करण्याची संधी द्यावी असे आवाहन मतदारांना केले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article