महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

साळ येथील ‘स्वरयज्ञ’ रियाज कार्यशाळेची सांगता

11:30 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : डॉ. उर्वी फडके व कला व संस्कृती संचालनालय आयोजित ‘स्वरयज्ञ’ ही 3 दिवसीय निवासी कार्यशाळा साळ येथील राऊत फार्महाऊस मध्ये नुकतीच   झाली. या वषी ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक पं. लक्ष्मण कृष्णराव पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली रियाज करण्यात आला. त्यांनी रियाजाचे विविध प्रकार सांगितले व करून घेतले. अष्टांग प्रधान गायकी याचे विस्तृतपणे विश्लेषण केले. त्यांच्या बरोबर त्यांची कन्या व थोर गायिका मीता पंडित याही स्वरयज्ञात सहभागी झाल्या होत्या. त्यांनीही स्वरसाधकांना मार्गदर्शन केले. त्याच बरोबर प्रवचनकार डॉ. संजय उपाध्ये यांनी ‘कलाकार आणि आत्मानंद’ या विषयावर सर्व स्वरसाधकांना मार्गदर्शन केले. या शिबिरात प्रसिद्ध वैद्य दिवाकर पंत वालावलकर यांनी ‘जीवनशैली आणि संगीत’ या विषयावर स्वरसाधकांना सविस्तर माहिती दिली. या शिबिरात सुयोग पटवर्धन याने स्वर साधकांकडून योग करून घेतले. शिबिराच्या शेवटच्या दिवशी सर्व स्वर साधकांना प्रमाणपत्र देण्यात आली. त्याच बरोबर शिबिरार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या शिबिराला गोवा पर्यटन खाते, डॉ. चंद्रकांत शेट्यो, डॉ शंकर जोशी व रियल ग्रुप ऑफ कंपनी यांनी विशेष सहाय्य केले. या शिबिरात गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक व गुजरात येथून शिबिरार्थी सहभागी झाले होते. 3 दिवसीय स्वरयज्ञ कार्यशाळेमध्ये स्वर, ताल, लय व साहित्य ह्यांची खऱ्या अर्थाने साधना झाली.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article