महाराष्ट्र | कोकणकोल्हापूरअहमदनगरमुंबई /पुणेसांगलीसातारासोलापूर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव बार असोसिएशनच्या कार्यशाळेची सांगता

10:16 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आनंद संजय नुली यांचा सत्कार

Advertisement

बेळगाव : राज्य बार असोसिएशन आणि बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पाच दिवसीय कार्यशाळेची सांगता बुधवारी झाली. सकाळी ज्येष्ठ वकील डी. एम. पाटील यांनी ट्रस्ट अॅक्ट संदर्भात वकिलांना माहिती दिली. या कार्यशाळेला वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील आनंद संजय एम. नुली उपस्थित होते. अध्यक्ष म्हणून बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसण्णावर होते. प्रमुख पाहुण्या म्हणून मुख्य जिल्हासत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजयालक्ष्मी देवी, राज्य बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. विनय मांगलेकर, सदस्य ॲड. ए. ए. मगदूम, सदस्य ॲड. के. बी. नाईक उपस्थित होते.

Advertisement

प्रारंभी जनरल सेक्रेटरी ॲड. वाय. के. दिवटे यांनी स्वागत केले. अध्यक्ष ॲड. एस. एस. किवडसण्णावर यांनी पाच दिवसांमध्ये कार्यशाळेतून करण्यात आलेल्या मार्गदर्शनाची माहिती दिली. वकिलांनीही सहकार्य केल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष ॲड. बसवराज मुगळी, ॲड. शीतल रामशेट्टी, ॲड. विजयकुमार पाटील, जॉईंट सेक्रेटरी ॲड. विश्वनाथ सुलतानपुरी, सदस्य ॲड. सुमीतकुमार अगसगी, ॲड. विनय नागनुरे, ॲड. इराण्णा पुजेर, ॲड. सुरेश नागनुरी, ॲड. अनिल पाटील, महिला प्रतिनिधी ॲड. अश्विनी हवालदार यांच्यासह इतरांनी परिश्रम घेतले.

ॲड. आनंद नुली यांचा सत्कार 

सर्वोच्च न्यायालयामध्ये काम करत असलेले ॲड. आनंद संजय एम. नुली यांचे बेळगाव येथे शिक्षण झाले. बेळगाव येथे काही वर्षे सेवा बजावली.त्यानंतर उच्च न्यायालयात वकील म्हणून काही वर्षे काम केल्यानंतर थेट सर्वोच्च न्यायालयात काम करण्यास सुरुवात केली. आज ते ज्येष्ठ वकील म्हणून कार्यरत आहेत. भारत सरकारच्या केंद्रीय संस्था पॅरालिम्पिक कमिटी बृहत बेंगळूर तसेच बेंगळूरच्या विकास प्राधिकरणावर सल्लागार म्हणूनही कार्यरत असून इंडिया बार कौन्सिलचे ते सदस्य आहेत. त्यांचा बेळगाव बार असोसिएशनच्यावतीने विशेष सत्कार करण्यात आला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article