For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील कॉम्प्युटर विभागाला ‘एक्सलंट’ मानांकन

04:29 PM Jul 31, 2024 IST | अनुजा कुडतरकर
भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील कॉम्प्युटर विभागाला ‘एक्सलंट’ मानांकन
Advertisement

सावंतवाडी । प्रतिनिधी

Advertisement

यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा विभागाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांच्यामार्फत केल्या जाणाऱ्या मूल्यांकनामध्ये एक्सलंट हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. मंडळाशी संलग्न संस्थांची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी हे मूल्यांकन करण्यात येते.यामध्ये अध्यापन पद्धत, निकाल ,राबविण्यात येणारे शैक्षणिक व इतर उपक्रम ,इंडस्ट्रियल व्हिजिट, तज्ञांची व्याख्याने, व्यक्तिमत्व उद्योजकता विकास कार्यक्रम, प्लेसमेंट आदी अनेक गोष्टींचा समावेश असतो. सर्व बाबींची काटेकोर तपासणी केल्यानंतर मंडळामार्फत पुअर, सॅटिसफॅक्टरी, गुड ,व्हेरी गुड , एक्सलंट अशा श्रेणीमध्ये मानांकन देण्यात येते. यापैकी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मधील कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा विभागाला एक्सलंट हे सर्वोच्च मानांकन प्राप्त झाले आहे. कॉम्प्युटर विभागाला मिळालेल्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत-भोसले, प्राचार्य डॉ.रमण बाणे, उपप्राचार्य गजानन भोसले यांनी यांनी विभागप्रमुख व शिक्षकांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement
Advertisement
Tags :

.