महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सिद्धगिरी हॉस्पिटल-रिसर्च सेंटरमध्ये 102 रुग्णांवर मेंदूच्या जटिल शस्त्रक्रिया

12:35 PM Sep 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वैद्यकीय संचालक-न्युरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांची माहिती

Advertisement

बेळगाव : सिद्धगिरी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर येथे तब्बल 102 रुग्णांवर मेंदूच्या अत्यंत जटिल अशा क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करणारे ग्रामीण भागातील ते पहिलेच व भारतातील मोजक्या रुग्णालयांपैकी एक आहे. आता मेंदू विकाराने त्रस्त असणाऱ्या रुग्णांना महानगरात जाण्याची गरज नसून कणेरी मठ येथे त्यांना उपचार मिळू शकतात, असे आवाहन हॉस्पिटल वैद्यकीय संचालक व न्युरोसर्जन डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी पत्रकार परिषदेत दिले. ते म्हणाले, सिद्धगिरी हॉस्पिटल पश्चिम महाराष्ट्रातील सेवाभावी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. मेंदू विकारामध्ये क्रॅनिओटॉमी शस्त्रक्रियेची गरज असते. आवश्यक उपकरणांसह महानगरात ती केली जाते. अन्यत्र हे उपकरण उपलब्ध नसल्याने रुग्णांची गैरसोय होते. ती टाळण्यासाठी सिद्धगिरीने आता या शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

कणेरी मठाचे काडसिद्धेश्वर स्वामी म्हणाले, या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत असे फंक्शनल एमआरआय मशीन आहे. ज्याद्वारे रुग्णाच्या मेंदूतील नियंत्रण भागाला अचूक अधोरेखित करता येते. तसेच टॅक्टोग्राफी तंत्रज्ञानामुळे विविध नसा रंगासह रेकॉर्ड केल्या जातात. त्यामुळे त्या भागापर्यंतचा प्रवास सुस्पष्ट होतो. या शस्त्रक्रियेमध्ये मेंदूच्या प्रमुख भागात भूल देऊन फक्त तोच भाग बधीर केला जातो. शस्त्रक्रियेवेळी सुद्धा रुग्ण बोलू शकतो. हॉस्पिटलमधील भूलतज्ञ डॉ. प्रकाश भरमगौडर हे यशस्वीपणे गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत आहेत. यावेळी डॉ. शिवशंकर मरजक्के यांनी व्हिडिओ माध्यमाद्वारे शस्त्रक्रियेची माहिती दिली. यावेळी डॉ. प्रकाश भरमगौडर, राजेंद्र शिंदे, कुमार चव्हाण, ऋतुराज भोसले, दयानंद डोंगरे उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article