महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

फ्रेश रक्ताअभावी थांबलेल्या दोन ओपन हार्ट शस्त्रक्रीया पूर्ण

11:52 AM Sep 20, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

युवा रक्तदाता संघटना ठरली हक्काची 'ब्लड बँक'

Advertisement

ओटवणे प्रतिनिधी
गोवा बांबोळी रुग्णालयात सावंतवाडी आणि बांदा येथील दोघांच्या ओपन हार्ट शस्त्रक्रीया १० फ्रेश रक्ताच्या पिशव्याअभावी प्रतीक्षेत असताना युवा रक्तदाता संघटनेच्या रक्तदात्यांनी रक्तदान करीत या दोघा रुग्णांचे प्राण वाचवले. त्यामुळे रूग्णांसाठी हक्काची 'ब्लड बँक' ठरलेल्या सावंतवाडीतील युवा रक्तदाता संघटनेने पुन्हा आपली ओळख कायम ठेवली आहे. त्यामुळे रक्तापलीकडचे नाते जपणाऱ्या युवा रक्तदाता संघटनेसह सर्व रक्तदात्यांचे या दोन्ही रुग्णाच्या नातेवाईकांनी आभार मानले.गोवा बांबोळी रुग्णालयात ओपन हार्ट शस्त्रक्रीयेसाठी सावंतवाडी येथील राजन गावडे आणि बांदा येथील राकेश केसरकर दाखल होते. यासाठी ओ पॉझिटिव्ह या रक्तगटाच्या १० फ्रेश रक्तपिशवींची आवश्यकता होती. मात्र दहा फ्रेश रक्तपिशव्या उपलब्ध करणे कठीण असल्यामुळे या दोन्ही रूग्णांच्या नातेवाईकांनी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर देव्या सुर्याजी यांनी आपल्या संघटनेच्या रक्तदात्यांना संपर्क करीत नियोजन केले.त्यानुसार युवा रक्तदाता संघटनेचे रक्तदाते अथर्व सावंत, संदेश नेवगी, नाविद हेरेकर, वसंत सावंत, सुमीत मुळीक, अक्षय पंडीत, अनिकेत सावंत, अमिर खान, प्रभाकर वडार, ज्ञानेश्वर राणे या दात्यांनी सावंतवाडीतून तात्काळ गोवा बांबोळी रुग्णालयामध्ये जाऊन रक्तदान केले. या सर्वांनी रक्तदान केल्यामुळे रक्ताअभावी थांबलेल्या दोन्ही रुग्णांच्या ओपन हार्ट शस्त्रक्रियां पूर्ण झाल्या. त्यामुळे तात्काळ रक्तपुरवठा केल्याबद्दल युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी व रक्तदात्यांचे रुग्णांच्या नातेवाईकांनी आभार मानले. दरम्यान अनेक ठिकाणी संघटनेचे सदस्य आणि रक्तदाते सामाजिक भान ठेवून अपघातग्रस्त तसेच तातडीच्या शस्त्रक्रियेवेळी डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील दुवा बनून रक्तदान करत आहेत‌. गेली अनेक वर्ष युवा रक्तदाता संघटना रक्तदान चळवळीत कार्यरत आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासह, जिल्हा रुग्णालय ओरोस व गोवा मणीपाल रूग्णालय येथे उपचार घेणाऱ्या रूग्णांच्या मदतीला युवा रक्तदाता संघटनेच्या रक्तदात्यांनी धावून जात रूग्णांना जीवनदान दिले आहे.
गेली ८ वर्षे गोवा बांबोळी व कोल्हापूर येथे ह्रदयशस्त्रक्रीयेसाठी तातडीने लागणारे रक्तदाते युवा रक्तदाता संघटना अध्यक्ष देव्या सुर्याजी यांच्या माध्यमातून दिले जात आहे. यापुढेही रक्तदानासाठी संघटना अशाच पद्धतीने कार्यरत राहील. या लाल क्रांतीमध्ये अनेकांनी सामील होऊन रक्तदान करावे आणि रूग्णांचे जीव वाचवावेत असे आवाहन युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी केले आहे.

Advertisement

 

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # yuva raktdata sanghtana # sawantwadi
Next Article