अमृत प्रकल्पाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण करा
उज्ज्वल घोष यांची सूचना : विजापूर येथे अधिकाऱ्यांची बैठक
वार्ताहर/विजापूर
विजापूर शहरातील केंद्र पुरस्कृत अमृत-1.0 प्रकल्प पूर्ण करण्यासाठी जलमंडलने अनेकवेळा विविध टप्प्यांवर नोटिसा बजावल्या आहेत. सध्याच्या क्षेत्रनिहाय प्रगतीचा आढावा घेऊन डिसेंबर-2024 अखेर कामे पूर्ण करावीत. ठेकेदाराने विहित मुदतीत कामे पूर्ण न केल्यास निविदा नियमानुसार दंड आकारण्याची कारवाई करण्यात येईल, अशी सूचना कार्मिक आणि प्रशासकीय सुधारणा विभागाचे सचिव विजापूर जिल्हा प्रभारी सचिव उज्ज्वलकुमार घोष यांनी दिली. ते येथे आयोजित अधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलत होते. अध्यक्षस्थानी कर्नाटक शहर पाणीपुरवठा व मलनिस्सारण मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सेल्वामणी आर. होते. घोष पुढे म्हणाले, प्रकल्प आराखडा तयार करणे, प्रशासकीय मान्यता आणि निविदा मागविणेबाबत पावले उचलावीत, अशा सूचना केल्या.