लम्पी-लाळ्याखुरकतचे तालुक्यातील लसीकरण पूर्ण करा
खानापूर पशुवैद्यकीय उपसंचालकांना निवेदन
खानापूर : तालुक्यात ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात बाहेरील जिल्ह्यातून भरपूर असे शेळ्या मेंढ्याचे कळप खानापूर तालुक्यात येत असतात. त्यामुळे लाळ्या खुरकतचे प्रमाण मोठ्या प्रमाणत वाढते. आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊन जनावर मृत्युमुखी पडतात. त्यामुळे उपाययोजना करावी. लंपी सुद्धा पूर्णपणे प्रतिबंधित नाही त्यामुळे गाई, बैलामध्ये याचे परिणाम जास्त आढळतात. त्यावरही तालुक्यातील शिल्लक गावामध्ये लसीकरण करून घ्यावे आणि या दोन्ही रोगाबद्दल शेतकरी आणि नागरिकांमध्ये जागृती निर्माण करावी, अशा आशयाचे निवेदन गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी पशु वैद्यकीय उपसंचालक यांना दिले.
पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मुळट्टी आणि लाईव्ह स्टॉक अधिकारी गुरव उपस्थित होते. याचबरोबर पशुवैद्यकीय खात्याकडून पुरविल्या जाणाऱ्या योजना सर्व नागरिकांपर्यंत पोहचवा आणि तळागाळातील शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा, याविषयीही चर्चा करण्यात आली. जास्तीत जास्त जनावरांना लसीकरण केल्याबद्दल पशू वैद्यकीय खात्याचे अभिनंदन प्रसाद पाटील यांनी केले. यावेळी नामदेव कोलकार, कल्लाप्पा लोहार, सुनील कोलकार, जोतिबा सुतार, सतीश बुरुड, गणेश देसाई, ओमकार कुंभार, सुरेश पाटील उपस्थित होते.