महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विद्यापीठ भुयारी मार्गाचे काम मुदतीत पूर्ण करा; उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देश

07:22 PM Feb 03, 2024 IST | Abhijeet Khandekar
Advertisement

कोल्हापूर प्रतिनिधी

शिवाजी विद्यापीठातील पूर्व व पश्चिम भागास कायमस्वरुपी जोडण्याकरिता बांधण्यात येत असलेल्या भुयारी मार्गामुळे विद्यार्थ्यांसह अन्य घटकांची सोय होणार आहे. भुयाराचे काम उत्तम पद्धतीने आणि मुदतीमध्ये पूर्ण करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिक्रायांसह ठेकेदारांना दिले.

Advertisement

शिवाजी विद्यापीठातील भुयारी मार्ग कामाच्या भूमीपूजनप्रसंगी ते बोलत होते. कुदळ मारुन तसेच कोनशिलेचे अनावरण करून भूमीपूजन समारंभ करण्यात आला. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे उपस्थिती होती.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विशेष प्रयत्नांमुळे या भुयारी मार्गाच्या कामासाठी महाराष्ट्र शासनाकडून 8 कोटी 48 लाख 81 हजार 945 रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 2 कोटी 50 लाख रुपयांचा निधी विद्यापीठास प्राप्तही झाला आहे. त्यामधून या कामास प्रारंभ करण्यात आला. विद्यापीठाचा विस्तार काळानुसार पूर्व व पश्चिम अशा दोन्ही बाजूंना होत आहे. भविष्यातही पूर्व बाजूला अनेक इमारती व संकुले निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे या दोन्ही बाजूंकडील विद्यार्थी, शिक्षक व अभ्यागत आदींची वर्दळ महामार्गावरुन वाढली होती. त्यातून अनेक छोटे-मोठे अपघात घडले. त्यामुळे या दोन्ही बाजू भुयारी मार्गाने जोडण्याची विद्यापीठाची मागणी होती. माझ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मंत्री पदाच्या कार्यकाळात त्यास मान्यता देण्यात आली. आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून निधीची तरतूद केल्याने हे काम गतीने पूर्ण होईल. काम दर्जेदार करावे तसेच कार्यपूर्तीनंतर विद्यापीठानेही त्याची देखभाल करावी, अशा सूचना मंत्री पाटील यांनी दिल्या.

Advertisement

यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता एस.पी. कुंभार, कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील, उपअभियंता हेमा जोशी, कनिष्ठ अभियंता पूजा देसाई, उपकुलसचिव रणजीत यादव, ठेकेदार राजू इनामदार, विद्यापीठ व्यवस्थापन परिषद, विद्या परिषद व अधिसभा सदस्य, बांधकाम सल्लागार समितीचे सदस्य, अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी, आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :
Minister Chandrakant Patilshivaji-univercitytarun bharat news
Next Article