Satara : गिरवी येथे कार्तिक एकादशी निमित्त श्रीमद् भगवद्गीतेचे पूर्ण पठण
मनापासून केलेली उपासना साधकाला सात्विक बनवते : कल्याणी नामजोशी
फलटण : कोणतीही उपासना, पारायण आपण मनापासून केल्यास ग्रंथपाठ जेव्हा मुखातून जातो, तो ग्रहण करताना शरीर, मन, बुद्धी, अहंकार यावर मात करुन आपण सात्विक बनतो, असे प्रतिपादन प्रवचनकार कल्याणी नामजोशी यांनी केले.
गिरवी, ता. फलटण येथील गोपालकृष्ण मंदिर येथे कार्तिक एकादशीचे औचित्य साधून श्रीमद् भगवद्दीतेच्या संपूर्ण १८ अध्यायांचे पठण, विष्णु सहस्त्रनामाचे पठण आणि तुलसी अर्चन करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रत्येक साधकाने गीतापठण अथवा इतर ग्रंथांचे पठण केल्यास प्रत्येक मंत्राची शक्ती देह, श्वास, मेंदूपर्यंत जाते. तरुणपिढी चांगली घडविण्यासाठी आज उपासना व पारायण करण्याची आवश्यकता आहे. असे उत्तम अनुभव व प्रचिती येते.
निदर्शनास यावेळी राज्याच्या विविध भागातून आणून नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नामजोशी परभणी, सोलापूर, मुंबई, नाशिक यांनी सांगितले की, गिरवी भगवान श्रीकृष्णांचे एक महत्त्वाचे वसतीस्थान असून येथे दर्शन, उपासना, सेवा करणाऱ्या भाविकांना आदी शहरांतून मोठ्या संख्येने भाविक आले होते. पूजेनंतर उपस्थित सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदिराचे विश्वस्त जयंतराव देशपांडे व सुनिता देशपांडे यांनी केले.