महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गॅरंटी योजनांमुळे काँग्रेसला राज्यात पूरक वातावरण

11:29 AM May 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अन्न व नागरी पुरवठा मंत्री के. एच. मुनीयप्पा यांची माहिती

Advertisement

बेळगाव : राज्य सरकारकडून राबविलेल्या पाच गॅरंटी योजनांमुळे गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे. तर या निवडणुकीत या योजनांचा प्रभाव मतदारांवर झाला असून राज्यात काँग्रेसला पुरक वातावरण आहे. भाजपकडून तांदूळ वितरणात राजकारण केल्याने नागरिकांना तांदळाऐवजी पैसे द्यावे लागत असल्याचा आरोप अन्न व नागरी पुरवठा मंत्री के.मुनीयप्पा यांनी केला. काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती दिली. पुढे ते म्हणाले, राज्यामध्ये काँग्रेसला पुरक वातावरण आहे. त्यामुळे अधिक जागा जिंकण्याचा विश्वास आहे. दिलेले वचन पाळल्याने बोले तैसा चाले हे दाखवून दिले आहे. जनतेला तांदूळ वाटण्याचा विचार राज्य सरकारने केला होता. याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी तांदळाचा साठा असल्याचे सांगितले होते. मात्र केंद्र सरकारने यामध्ये राजकारण केले आहे. यामुळे राज्यातील जनतेला तांदळाऐवजी पैसे दिले जात आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article