राम गोपाल वर्मा विरोधात तक्रार दाखल
मॉर्फ्ड छायाचित्र केले होते पोस्ट
वृत्तसंस्था/ अमरावती
बॉलिवूड दिग्दर्शक राम गोपाल वर्मा आता नव्या कायदेशीर संकटात सापडत असल्याचे चित्र आहे. वर्मा विरोधात आता आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या प्रतिष्ठेला ठेच पोहोचविल्याप्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली आहे. तेलगू देसम पक्षाचे नेते रामलिंगम यांनी म•ाrपाडू पोलीस स्थानकात राम गोपाल वर्मा विरोधात सोशल मीडियाचा गैरवापर करत मुख्यमंत्री नायडू, त्यांचे पुत्र नारा लोकेश, सून ब्रह्माणी आणि अन्य नेत्यांची प्रतिमा मलीन केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी आता तक्रार नोंदवून घेत तपास सुरू केला आहे.
राम गोपाल वर्मा हे वायएसआर काँग्रेस पक्षाचे समर्थक असून चंद्राबाबू नायडू आणि त्यांच्या पक्षाच्या विरोधात वक्तव्यं करत असतात. रामगोपाल वर्मा यांचा चित्रपट व्यूहम मार्च महिन्यात प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट 2009 मधील हेलिकॉप्टर दुर्घटनेत तत्कालीन मुख्यमंत्री वाय.एस. राजशेखर रेड्डीr यांचा मृत्यू आणि त्यांचे पुत्र जगनमोहन रेड्डी यांच्या राजकीय प्रवासावर आधारित होता. वाद निर्माण झाल्याने या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते. त्यावेळी चंद्राबाबू यांचे पुत्र नारा लोकेश यांनी चित्रपटाचे प्रदर्शन स्थगित करण्याची मागणी केली होती. याच्या प्रत्युत्तरादाखल वर्मा यांनी अनेक सोशल मीडिया पोस्ट करत चंदाबाबू यांच्यासंबंधी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. तसेच त्यांनी एक मॉर्फ्ड छायाचित्र पोस्ट केले होते. आता याचप्रकरणी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे.